Ads

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध मोहा हातभट्टी दारु वर धडक कारवाई..

चंद्रपुर :-विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचार संहीता लागु होताच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत तसेच अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचेकडुन सर्व पोलीस स्टॉफला निर्देश प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी वेगवेगळे पथके स्थापन करुन मोहा हातभट्टी दारु विरुध्द कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने
Local Crime Branch, Chandrapur has launched a crackdown on illegal Moha Handbhatti liquor.
सदर कारवाईच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असतांना स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकास माहीती मिळाली की, पो.स्टे. भद्रावती हद्दीत मौजा बरांज तांडा परपीसरात मोठ्या प्रमाणात मोहा हातभट्टी दारु काढत असल्याची गोपनीय माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर व पो.स्टे. भद्रावती येथील पथक रवाना होवुन मौजा बरांज तांडा येथे शोधमोहीम राबवुन चालु असलेल्या हातभट्टी नाश करण्यात आली तसेच मोहा दारु काढण्यासाठी वापरात येणारा मोहासडवा व मोहा हातभट्टी दारु एकुण 69,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल नमुने घेवुन नष्ठ करण्यात आला व आरोपी 1) निता मानसिंग बानोत 2) सुनिता रविंद्र पाटील 3) महेश लालु आमगोत तिन्ही रा. बरांज तांडा ता. भद्रावती यांचे विरुध्द पो.स्टे. भद्रावती येथे दारुबंदी कायद्यान्वये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास पो.स्टे. भद्रावती करीत आहे.

उपरोक्त कारवाई मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, मधुकर सामलवार, संतोष निंभोरकर, सफौ स्वामीदास चालेकर पोहवा धनराज करकाडे, अजय बागेसर, सुरेंद्र महतो, रजनिकांत पुट्टावार, गणेश मोहुर्ले पोअं. प्रशांत नागोसे, शशांक बदामवार स्थागुशा चंद्रपुर तसेच पो.स्टे. भद्रावती यांचे पथकाने यशस्वीरीत्या कारवाई केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment