Ads

गडचांदूर पोलिसांना शाळा, महाविद्यालय दीले दत्तक.!

कोरपना :-बदलापूर,कोरपना व इतर ठिकाणी घडलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.अशा घटना रोखण्यासाठी पोलीस विभाग अलर्ट मोडवर असून ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना जागृत करण्याची मोहिम हाती घेतल्याचे दिसून येत आहेत.याच श्रेणीत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव,यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात गडचांदूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, अंमलदार यांना पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा,महाविद्यालय दत्तक देण्यात आल्या आहेत.
Gadchandur police gave school, college for adoption.
नियुक्त केलेले हे पोलीस त्या-त्या शाळा, महाविद्यालयात जाऊन हल्लीच्या काळात मुली -मुलांवर होणार्‍या अत्याचाराबाबत विद्यार्थ्यां मध्ये जागृती घडवून आणत आहेत.बॅड टच,गुड टच,तसेच मुलींवरील अत्याचार संदर्भात कायद्याची माहिती देत आहे.भविषयात कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अनपेक्षित प्रकार होताना आढळून आल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापकांना पोलिसांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहे. पोलिसांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांवर होणारे विविध प्रकारच्या अत्याचारावर अंकुश लागेल,असे मत व्यक्त होत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment