Ads

"अम्माच्या टिफिन" ची अम्माने घेतला जगाचा निरोप

चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगूबाई जोरगेवार यांचे आज सकाळी ९.३० वाजता निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. नागपुरात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Mother of MLA Kishore Jorgewar passed away at the age of 80
अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी आपला व्यवसाय सांभाळला आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावला. त्यांचा मुलगा आमदार झाल्यानंतरही त्यांनी कोणत्याही महत्त्वाकांक्षेशिवाय व्यवसाय सुरूच ठेवला. चंद्रपूरमध्ये त्यांनी सुरू केलेल्या “अम्मा का टिफिन” या उपक्रमामुळे शेकडो गरीब लोकांना मोठा दिलासा मिळाला. अम्मा यांनी सुरू केलेल्या या सामाजिक बांधिलकीचे अनेकांनी कौतुक केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

अम्मा गेल्या पन्नास वर्षांपासून सतत बांबूच्या विविध उत्पादनांचा व्यवसाय करत आहेत. मुलगा मोठा नेता, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार असतानाही त्या आपल्या तत्त्वांवर ठाम होत्या .अम्मांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नावाने चंद्रपूरात सुरु असलेल्या "अम्मा का टिफिन" आणि "अम्मा कि दुकान" या उपक्रमामुळे अनेकांना हक्काची साथ मिळाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने उपचारासाठी त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. जवळपास 10 दिवस नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने काल शनिवारीच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. घरी डॉक्टरांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला आणि सकाळी 9.30 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
उद्या सकाळी 9 वाजता होणार अंत्यविधी
उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता गांधी चौक येथील कोतवाली वार्ड येथील घरून अंत्ययात्रा निघणार आहे. बिनवा गेट येथील शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment