Ads

वरोऱ्यात धावली तरूणाई....

सादिक थैम वरोरा: प्रसिध्द नेत्रचिकीत्सक डॉ.चेतन खुटेमाटे यांच्या चला बदल घडवुया या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या पर्वावर दि.1 सप्टेंबर रोजी वरोरा भद्रावती मॅरेथॉन 2024 चे आयोजन वरोरा शहरात सकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आले होते.
Youth ran in Warora....

14 वर्षा खालील, 18 वर्षा आतील , खुल्या गटातील स्त्री आणि पुरुष करिता प्रत्येकी 6 पारितोषिक , एकंदरीत 73000 रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात आली. आरोग्यविषयक जनजाग्रुति करिता सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २५२स्त्री ३४७पुरुष गटात आपला सहभाग नोंदवीत 2 किमी , 5 किमी अंतरादरम्यान धावपटूनी धावून स्पर्धेची रंगत वाढविली.
मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी डाॅ.चेतन खुटेमाटे,मारोती मोरे,रुपलाल कावडे,खेमराज कुरेकार,प्रा.प्रविण खिरटकर,डाॅ.राठोड मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते 36 धावपटूंना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांची ऊर्जा सामाजिक स्वास्था करिता मार्गस्थ करून तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला भविष्यात अधिक व्यापक करण्याचा मानस स्पर्धेचे आयोजक डॉ चेतन खुटेमाटे यांनी व्यक्त केला .

स्पर्धेचे आयोजन आनंद निकेतन महाविद्यालया चे प्रा.तानाजी बायस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील क्रीडा स्वयंसेवक तथा चला बदल घडवूया च्या कार्यकर्त्यां द्वारे करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन राहुल तायडे यांनी केले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्या करिता संदिप सोनेकर,चंद्रशेखर झाडे,संकेत गोहकर,उल्हास बोढे,विशाल मोरे,व्यंकटेश खटी,सुर्दशन घागी,स्वप्निल टाले,विठ्ठल भेदुरकर,विजय झाडे,अनुप खुटेमाटे,मेहुल शेगमवार,निलेश पिंगे,राहुल ताजणे,सचिन खुटेमाटे,प्रविण वासेकर,तुषार कडू,सतिश परचाके यांनी अथक परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment