Ads

विधानसभेचे प्रबळ दावेदार न व्हावे म्हणून पक्षातून हेतू पुरस्पर ६ वर्षाकरिता निलंबन : डॉ.विजय देवतळे

सादिक थैम वरोरा : पक्षविरोधी कोणतेही काम केले नसताना पक्षासाठी इमाने इतबारे काम करीत असताना सुद्धा केवळ आगामी विधानसभेसाठी या भागातील काँग्रेस उमेदवारीचे प्रबळ दावेदार न व्हावे म्हणून या क्षेत्रातील पक्षाच्या एका प्रबळ नेत्याच्या सांगण्यावरून आम्हा दाम्पत्याला पक्षश्रेष्ठींने यावर आमचे म्हणणे न ऐकता ६ वर्षासाठी निलंबित केले. हा आम्हाला राजकारणातून संपविण्याचा डाव असल्याचे डॉ.विजय देवतळे यांनी पत्र परिषदेत सांगितले.
Suspension for 6 years from the party to avoid becoming a strong contender for the Legislative Assembly: Dr. Vijay Devtale
एखाद्या प्रकरणावर न्याय देताना न्यायालय दोन्ही बाजू ऐकून न्याय देते. परंतु या ठिकाणी त्या नेत्याचेच म्हणणे ऐकून आम्हा उभयंता पती,पत्नीला काँग्रेस पक्षातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आदेशाने नाना गावंडे यांनी ६ जुलै २०२४ ला पत्र देऊन ६ वर्षाकरिता निलंबित केले. हे निलंबन घटनाबाह्य आहे. पक्षश्रेष्ठींनी आमचे म्हणणे ऐकून नंतर त्यावर निर्णय द्यावयास पाहिजे होता. स्वातंत्र्य पूर्वीपासून देवतळे घराणे काँग्रेस सोबत आहे. स्वर्गीय दादासाहेब देवतळे हे सन १९६२ मध्ये या भागातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी मंत्रिपद देखील भूषविले. त्यांचे पश्चात स्वर्गीय संजय देवतळे यांनी या भागाचे नेतृत्व केले. ते सुद्धा मंत्री राहिले. सन २०१४ मध्ये संजय देवतळे यांना पक्षाने लोकसभेकरिता तिकीट दिली.त्यात ते पराभूत झाले. नंतरच्या विधानसभेकरिता पक्षाने त्यांना विधानसभेची तिकीट न देता माझी पत्नी डॉ. आसावरी देवतळे यांना तिकीट दिली. त्यावेळी संजय देवतळे भाजपाकडून लढले. मत विभाजनामुळे शिवसेनेचे बाळू धानोरकर निवडून आले. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने शिवसेनेच्या बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी आम्ही उभयंत्यांनी पक्षाचे उमेदवार बाळू धानोरकर यांचा प्रचार करून निवडून आणले. नंतरच्या विधानसभेकरिता त्यांनी आपली पत्नी प्रतिभा धानोरकरांना तिकीट मिळवून दिली. प्रतिभा धानोरकर यांचे काँग्रेस पक्षात कोणतेही योगदान नव्हते. या माध्यमातून आमच्यावर पक्षाने त्यावेळी अन्याय करून सुद्धा आम्ही पक्षाशी ईमान राखून काम करीत आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आम्ही प्रबळ दावेदार उमेदवार म्हणून होतो.मात्र आम्हास पक्षश्रेष्ठींने काही कारण नसताना ६ वर्षाकरिता पक्षातून निलंबित केले. पक्षश्रेष्ठीने आमचे हे निलंबन मागे घ्यावे असे डॉ.विजय देवतळे यांनी यावेळी सांगितले. विधानसभेच्या गोपनीय मतदान प्रक्रियेत या नेत्याने पक्षविरोधी मतदान करून सुद्धा पक्षश्रेष्ठींने त्यांचेवर कोणतीच कारवाई केली नाही. परंतु त्याच लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून आम्हास पक्षातून निलंबित केले हा कसा न्याय असे डॉ.देवतळे यांनी शेवटी सांगितले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment