Ads

संशयावरून पती ने पत्नीची चाकूने वार करून केली हत्या..

बल्लारपूर :- crime news संशय घेऊन पतीने पत्नीला चाकु ने वार करीत तिची क्रूरपणे हत्या केल्याची घटना बल्लारपूर तालुक्यातील कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुडेसावली गावात आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. वंदना धनपाल रामटेके वय ६० वर्ष रा. कुडेसावली असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती धनपाल माधव रामटेके वय ६७ वर्ष याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
The husband killed his wife by stabbing her with a knife
पती धनपाल हा नेहमी आपली पत्नी वंदना वर संशय घेऊन वारंवार भांडण करायचा. त्यामुळे तो मुलगा अमर रामटेके सोबत मागील दोन महिन्यापासून दुर्गापूर ला राहत होता.पोळ्याचा सणाला धनपाल हा कुडेसावली येथे आला. तेव्हा पासून तो तिथेच होता. दरम्यान आज गुरुवारी सकाळी सुद्धा त्या दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान वंदना भांडे घासत असताना धनराज ने धारदार चाकूने वार करीत तिच्या पाठीत भोसकला. ती मागे वळली असता पुन्हा तोच चाकू पोटात भोसकला. रक्ताच्या थारोळ्यात वंदना कोसळली. गावकरी जखमी वंदना जवळ जात असताना धनपाल चाकू घेऊन धमकी देत कुणी गावकरी जर तिला वाचवायला पुढे आला तर त्याला सुद्धा ठार करू. त्यामुळे कुणीही पुढे यायची हिम्मत केली नाही.
काही वेळाने पोलिसांचे वाहन आले. त्यात जखमी वंदना ला कोठारी येथील रुग्णालयात नेले. मात्र तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने बल्लारशा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच कोठारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश खरसान आपल्या घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतकाचा पती धनपाल रामटेके याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार योगेश खरसान करत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment