Ads

सात इच्छुक उमेदवारांचा घाटंजीत पत्रकार परिषदेतून एल्गार

घाटंजी (तालुका प्रतिनिधी):- सद्यस्थिती महाराष्ट्र राज्यातील सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे पडघम वाजू लागले आहे.त्यामुळे आर्णी-केळापूर मतदार संघातील वातावरण खूप तापत आहे.गोंड समाजातील सुशिक्षित व उच्चशिक्षित, शासन प्रशासन व सामाजिक चळवळीतील अनुभवी उमेदवार एकवटले आहेत.१९८५ पासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने बहुसंख्य असलेला गोंड समाजातील उमेदवारांना उमेदवारी दिलेली नाही, त्यामुळे आर्णी- केळापूर मतदान संघातील १,२५००० गोंड समाजातील मतदारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.त्यामुळे गोंड समाजातील सात सामाजिक जानीवेतील उमेदवारांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.तरी आर्णी-केळापूर मतदार संघातील सर्व समावेशक तेली,माळी, कुणबी, बंजारा, बौद्ध, मुस्लिम व ईतर अठरापगड जातींचे देखील स्थानिक गोंड समाजालाच उमेदवारी द्यावी अशी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे मतदार संघातील मतदार राजाची सुध्दा मागणी केल्या जात आहे.
Elgar from a press conference in Ghatjit of seven interested candidates
"अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा,अब राजा वही बनेगा जिसका वो हक्कदार होगा!" संविधान बचाव..देश बचाव,भारतीय संविधानातील ५ वी सुची व ६ वी सुची अंतर्गत पेसा कायदा १००% लागू करणे ,बोगस शासकीय नौकरी भरतीतील अधीसंख्येने रिक्त झालेल्या १२५०० नौकर भरती तात्काळ पदभरती करणे,या देशाचा पोशिंदा कष्टकरी शेतकऱ्यांचा मालाला हमीभाव तात्काळ मिळालाच पाहिजे, ग्रामीण भागातील विकासाकरिता प्राधान्यक्रम देणे, कष्टकरी शेतकरी शेतमजूर, तसेच सुशिक्षित बेरोजगारांना सर्वांगीण विकासासाठी आर्णी - केळापूर मतदान संघामध्ये औद्योगिकरण करणे, आर्णी केळापूर मतदान संघातील सर्व समावेशक तेली,माळी, कुणबी, बंजारा,बौद्ध, मुस्लिम व ईतर अठरापगड जातींचे देखील स्थानिक गोंड समाजालाच उमेदवारी द्यावी अशी रास्त मागणी आर्णी केळापूर मतदान संघातील इच्छूक उमेदवार माणिकराव तोडसाम, विठ्ठलराव मरापे, बळवंत नैताम,प्रा.निनाद सुरपाम, इंजिनिअर दत्तात्रय मेश्राम, इंजिनिअर अजय आत्राम, इंजिनिअर अजय घोडाम यांनी घाटंजी येथिल स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे. यांना मतदान राजा सुध्दा पसंती दर्शवित आहे.या सातही भावी आमदापैकी कोण बाजी मारणार याकडे आर्णी-केळापूर मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागले असून काँग्रेस पक्ष यांच्या मागणीला दुजोरा देतील काय याकडे सुद्धा पाहणे तेवढेच गरजेचे आहे.यावेळी पत्रकार परिषदेत विधानसभेच्या नानाविध विषयावर चर्चा झाली असून या मतदार संघात बाहेरून उमेदवार आयात करावा लागतो.हे मतदार संघाचा दुर्दैव असल्याचे सुद्धा इच्छुक उमेदवारांनी सांगितले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment