Ads

सुधीरभाऊंमुळे बल्लारपूर विधानसभेतील गरिबांना मिळणार हक्काचं घर!

चंद्रपूर : ‘घर म्हणजे केवळ घर नसतं… असल्या जरी चार भिंती… तरी जगण्यासाठी विणलेलं… सुंदर स्वप्न असतं’. बल्लारपूर क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणारे, जिव्हाळा जपणारे राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे आता अनेकांचं हक्काच्या घराचं सुंदर स्वप्न साकार होणार आहे. गरिबांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेंतर्गत हा लाभ बल्लारपूर विधानसभेतील गरिबांना मिळणार असून त्यासाठी सुधीरभाऊंनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे .
या योजनेंतर्गत पोंभुर्णा येथील 500, मुल येथील 376 आणि चंद्रपूर येथील 85 नागरिकांनी हक्काचं घर मिळणार आहे. आपल्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपुर्तीसाठीच केंद्र आणि राज्य सरकारने ‘सर्वांना घरे’ हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले असून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घरकुल योजनेच्या निधीकरीता सातत्याने पाठपुरावा केला. त्याचेच फलित म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील 961 लाभार्थ्यांना आता हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी 12 कोटी 49 लक्ष 30 हजार रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल, पोंभुर्णा चंद्रपूर तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजनेंतर्गत सन 2024-25 करीता 961 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता आणि लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी 1 लक्ष 30 हजार रुपये याप्रमाणे 12 कोटी 49 लक्ष 30 हजार इतक्या रकमेस मान्यता देण्यात आली आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील 500 लाभार्थ्यांना घरकुल
जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल, आणि पोंभुर्णा तालुक्यातील 961 लाभार्थ्यांना यशवतंराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुलचा लाभ होणार आहे. यामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील 500 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार असून यात चेक हत्तीबोडी लाभार्थी (60), घाटकुळ (106), सातारा भोसले (11), जामतुकूम (55), चेक आंबेधानोरा (22), मोहाळा रै (26), जुनगाव (42), बोर्डा झुल्लुरवार (12), बोर्डा बोरकर (127), चिंतलधाबा (16), नवेगाव मोरे (16) आणि फुटाणा मो येथील (7 लाभार्थी) लाभार्थ्यांचा समावेश आहे.

*मुल तालुक्यातील 376 लाभार्थ्यांना घरकुल*
मुल तालुक्यातील 376 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार असून यात चिमठा गावातील (27 लाभार्थी), विरई (33), गवराळा (28), उश्राळा (17), चिरोली (42), डोंगरगाव (115), सुशी (99), आणि राजगड येथील (13 लाभार्थी) आहे.

चंद्रपूर तालुक्यातील 85 लाभार्थी
यात चंद्रपूर तालुक्यातील 85 लाभार्थी आहेत. यात अजयपुर येथील (1 लाभार्थी), चिचपल्ली (21), मामला (11), चोरगाव (3), जुनोना (12), नागाळा म. (3), निंबाळा (9), पिंपळखुट (1), चेक पिंपळखुट (1), पिपरी (5), मोहर्ली (2), वरवट (12) आणि सिदूर येथील (4) लाभार्थ्यांचा समावेश आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment