Ads

वाघाच्या हल्ल्यात बैल गंभीर जखमी

जावेद शेख भद्रावती :-वाघाने केलेल्या हल्ल्यात एक बैल गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील मांगली शेत शिवारात दिनांक 17 रोज मंगळवार ला सकाळच्या वेळेस घडली. यात बैल मालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
Bull seriously injured in tiger attack
सदर घटनेची माहिती वनखात्याला कळविण्यात आली असून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बैल मालकाने केली आहे. मांगली येथील मारुती सलाम यांचे जंगल शिवारात शेत आहे. घटनेच्या दिवशी सकाळी त्यांचे बैल शिवारात चरत असताना जवळच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने बैलावर हल्ला केला. यावेळी अन्य गुराखी जवळच उभे होते ते सुदैवाने या हल्ल्यातून बचावले. या गुराख्यांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने बैलाला सोडून पळ काढला. यात बैलाच्या मानेवर व शरीरावर जखमा होऊन तो गंभीर जखमी झाला आहे. सदर बैलाची किंमत 50 हजार रुपये एवढी असल्याचे बैल मालकाकडून सांगण्यात आले. शिवारातील वाघाच्या या वास्तव्याने गुराखी तथा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment