Ads

अवैधरित्या गांज्या तस्करी करणा-या आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी अटक केली.

चंद्रपुर :- crime news चंद्रपुर जिल्ह्यामध्ये मुम्मुका सुदर्शन,पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्स, गांज्या विक्री करणा-या विरुद्ध धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांचे वतीने चालु आहे. त्या मोहीमेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, मुम्मुका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असुन सदर पथकाचे माध्यमातुन मोठया प्रमाणात अवैधरित्या ड्रग्स / गांज्याची विक्री करणा-याची माहिती काढुन त्यावर कारवाई सुरू आहे.
The accused who were illegally smuggling ganja were arrested by the Local Crime Branch, Chandrapur.
आज दिनांक ०६/०९/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनिय बातमी मिळाली की, नामे श्रीनिवास उर्फ सिक्कंदर विकल गुतकोंडावार, वय ३६ वर्ष, धंदा-मजुरी, रा. उर्जाग्राम ताडाली, चंद्रपुर, २) लतीश उर्फ लतिफ बंडु निवलकर, वय-१९ वर्ष, रा. आंबेडकर चौक, चंद्रपुर, ३) इरफान उर्फ भु-या इजाईल खान वय ३२ वर्ष, धंदा पानठेला, रा. बगडखिडकी, चंद्रपुर हे नागपुर वरून चंद्रपुर येथे त्यांचे ताब्यातील मोपेड गाडीवर क्रमांक एम. एच. ३४ बी.क्यु. ४५५९ नी अवैधरित्या गांज्याची वाहतुक करीत आहे अशा खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे भद्मवती ह‌द्दीत नागपुर ते चंद्रपुर हायवे वरील मौजा सायवन गावाजवळील पंजाबी धाब्या समोर नाकाबंदी करून खबरे प्रमाणे वरील आरोपीतांना मोपेड गाडीसह ताब्यात घेवुन झडती घेतली असता त्यांचेकडे एका नॉयलान थैलीमध्ये गांजा वनस्पतीचे पाने/फुले/बियांचे वजन ५,८४९ किलो ग्रॅम अंदाजे किमंत अंदाजे ९०,०००/- रू. तसेच पांढ-या रंगाची होंडा मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ३४ बी. क्यु. ४८५९ किमंत ८०,०००/- असा एकुण १,७०,०००/- रू. चा माल मिळुन आल्याने सदर तिन्ही इसमांविरूध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे पोलीस स्टेशन, भद्रावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोहवा/किशोर वैरागडे, पोहवा/सतिश अवथरे, नापोशि/संतोष येलपुलवार, पोशि/नितीन रायपुरे, पोशि/गोपाल आतकुलवार, पोशि/गोपीनाथ नरोटे, पोशि/अमोल सावे, पोशि/प्रफुल गारघाटे, पोशि/शशांक बदामवार, चपोहवा/दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment