Ads

७५- वरोरा विधानसभेत अंतर्गत विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर यांचे नियोजनात प्रमुख पाच गावांमध्ये लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन....

सादिक थैम वरोरा:- भद्रावती विधानसभा अंतर्गत भद्रावती व वरोरा तालुक्यातील प्रमुख पाच गावामध्ये लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने भद्रावती तालुक्यातील मुधोली या अत्यंत दुर्गम ग्रामिण भागातुन लाभार्थी सन्मान यात्रेची दिनांक १८ सप्टेंबर पासुन सुरुवात करण्यात आली.
75- Beneficiary Samman Yatra organized in five major villages in the planning of warora Legislative Assembly Chief Ramesh Rajurkar....
प्रथमतः भद्रावती तालुक्यातील मुधोली या अत्यंत दुर्गम ग्रामिण भागातुन लाभार्थी सन्मान यात्रेची दिनांक १८ सप्टेंबर पासुन सुरुवात करण्यात आली असुन त्यामध्ये गावातील बहुसंख्येनी लाभार्थी उपस्थित होते तसेच यात्रेमध्ये शासकीय योजनेचे स्टॉल लावण्यात आले असुन त्यामध्ये बरेच लाभार्थीना योजनेची माहिती देवुन नोंदणी सुध्दा केलेली आहे. मुधोली येथील मुख्य नियोजन हे श्री. दयानंदजी जांभुळे, अध्यक्ष विज नियंत्रण समिती, भद्रावती, रवि घोडमारे, उपसरपंच लोंडेगांव, श्री. बंडुजी नन्नावरे, सरपंच मुधोली, श्री. केशवराव जांभुळे, माजी सरपंच मुधोली, शंकर किर्तने, हनुमान राणे, मुरलीधर दडमल, अशोक नन्नावरे, ज्ञानेश्वर नन्नावरे, ज्ञानेश्वर दडमल, सत्यवान नन्नावरे, लक्ष्मण रणदिवे, यांनी केले असुन विशेष सहकार्य सरस्वती विद्यालय, मुधोली यांचे लाभले. यावेळी लाभार्थी सन्मान यात्रेतील कार्यक्रमांत मंचावर प्रमुख उपस्थिती वरोरा विधानसभा प्रमुख श्री. रमेश राजुरकर, प्रदेश सचिव श्री. करण देवतळे, श्री. मारोती गायकवाड माजी जि.प. सदस्य, श्री. प्रशांत डाखरे माजी नगरसेवक, न.प. वरोरा, श्री. बंडु नन्नावरे, सरपंच ग्रा. पं. मुधोली, श्री.बाळा पाचभाई, श्री.

गंगाधर कारेकार, हे उपस्थित होते व कार्यक्रमांचे सुत्र संचालन श्री. अनिल वाकोडे यांनी केले. दिनांक १९ सप्टेंबर ला भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे आयोजित लाभार्थी सन्मान यात्रेचे नियोजन श्री. मारोती गायकवाड माजी जि.प. सदस्य, श्री. गजेंद्र रणदिवे, श्री. संतोष हनमते, श्री. रुषी भरडे, श्री. बाळु महागमकर, श्री. सुनिल बदकी, श्री. दिनेश कोल्हटकर, श्री. अविनाश पुजदेकर, श्री. महेश टोंगे, श्री. वसंत लोहबडे, श्री. योगेश आवळे, श्री. रोश मानकर, श्री. प्रफुल वाभिटकर, श्री. जयेंद्र मगरे उपसरपंच ग्रा. पं. बेलगांव भु., श्री. सुरज चौधरी तालुका अध्यक्ष, ओबीसी आघाडी, यांनी केले असुन यावेळेस मंचावर विधानसभा प्रमुख श्री. रमेश राजुरकर, तालुका अध्यक्ष भगवान गायकवाड, उपसरपंच जयेंद्र मगरे, प्रफुल वाभिटकर, राजु दोडके, श्री. दिनेश कोल्हटकर हे उपस्थित होते व सुत्र संचालन श्री. अनिल वाकोडे यांनी केल.

कार्यक्रमांचे दिनांक २० सप्टेंबर ला भद्रावती तालुक्यातील माजरी आयोजित लाभार्थी सन्मान यात्रेचे नियोजन श्री. सुधिर उपाध्याय ज्येष्ठ नेते भाजपा, श्री. बापुराव केवट, श्री. राकेश तल्लावार, श्री. विस्मय बहादे, श्री. संदिप वनकर, दिपु प्रसाद, कमलेश केवट यांनी केले असुन यावेळेस मंचावर विधानसभा प्रमुख श्री. रमेश राजुरकर, भाजपा नेते किशोर टोंगे, श्री. बाळा पाचभाई, श्री. गंगाधर कारेकार है उपस्थित होते. या कार्यक्रमांत लहान मुलांसोबत विधानसभा प्रमुख यांनी संवाद केला व इतर खेळाचा आनंद लुटला, सोबतच मुख्यमंत्री माझी लाडली बहिण योजचेच्या महिला लाभार्थीशी संवाद करुन शासकीय योजनेची माहिती दिली व कार्यक्रमांचे सुत्र संचालन श्री. अनिल वाकोडे यांनी केले.
त्याचप्रमाणे वरोरा तालुक्यातील माढेळी येथे दिनांक २१ सप्टेंबर ला लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असुन येथील मुख्य नियोजन हे श्री. देवानंदजी महाजन, सरपंच ग्रा. पं. माढेळी, सौ. वनिताताई हुलके उपसरपंच, ग्रा. पं. माढेळी, सुनिल देवतळे, श्री. सुरज धात्रक तालुका महामंत्री भाजयुमो, राजु सवई सदस्य, ग्रा. पं. माढेळी, सौ. स्वप्नाताई हिकरे, श्री. उमेश माहुरे सदस्य, युवा मोर्चा यांनी केले व यावेळी यात्रेतील कार्यक्रमांत मंचावर प्रमुख उपस्थिती वरोरा विधानसभा प्रमुख श्री. रमेश राजुरकर, सरपंच देवानंदजी महाजन, उपसरपंच सौ. वनिता हुलके, तालुका महिला महामंत्री सौ. छायाताई गिरसावळे, तालुका महामंत्री युवा मोर्चा सुरज धात्रक, सुनिल देवतळे राजु सवई सदस्य, ग्रा. पं. माढेळी, सौ. स्वप्नाताई हिकरे, उमेश माहुरे, हे उपस्थित होते व कार्यक्रमांचे सुत्र संचालन श्री. अनिल वाकोडे यांनी केले.

दिनांक २२ सप्टेंबर ला लाभार्थी सन्मान यात्रेचे समारोपिय कार्यक्रम हा मौजा टेमुर्डा, ता. वरोरा येथे आयोजन करण्यात आले असुन त्याचे मुख्य नियोजन हे श्री. विशाल ढवस, सौ. जयश्री बोरीकर, सौ. संध्या घरडे, सौ. प्रतिभा नक्षिणे, प्रविण चौधरी, सुनिल प्रीपारे, साहिल राजकुमार, हरिश तेलरांधे, राकेश भोयर, गजानन गुजरकर, केशव नक्षिणे, चंद्रकांत दुभे, यश बैस, भोला कोडापे, अक्षय पेन्दाम, कुसुम कोटांगले, सुनिता चिडे, व सुमन बावणे यांनी केले.

सदर कार्यक्रमांस मागासवर्गीय आयोग, भारत सरकार चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. हंसराजी अहिर हे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते त्याचप्रमाणे मंचावर प्रमुख उपस्थिती मध्ये वरोरा विधानसभा प्रमुख श्री. रमेश राजुरकर, तालुका अध्यक्ष भगवान गायकवाड, महिला तालुका अध्यक्ष सौ. वंदना दाते, भाजपा पदाधिकारी सौ. शुभांगी निंबाळकर, प्रदेश सचिव युवा मोर्चा करण देवतळे, शहर महिला अध्यक्ष श्रीमती लिलाताई बोंढे, ज्येष्ठ नेते भाजपा अशोक हजारे, शहर अध्यक्ष भद्रावती भाजपा प्रविण सातपुते, माजी नगरसेवक प्रशांत डाखरे, विजय मोकाशी, श्री. सुरज धात्रक तालुका महामंत्री युवा मोर्चा, धनजंय पिंपळशेन्डे, राजु दाते, सौ. जयश्री बोरीकर, गंगाधर कारेकार, बाळाभाउ पाचभाई, विशाल ढवस हे उपस्थित होते व कार्यक्रमांचे सुत्र संचालन श्री. अनिल वाकोडे यांनी केले.

सदर समारोपिय कार्यक्रमांत मा. हंसराजी अहिर यांनी लोकांसोबत चाय पे चर्चा या स्टॉल वर जावुन प्रत्यक्ष चर्चा केली व शासकीय योजनेची संक्षिप्त माहिती दिली तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेतील लाभार्थी महिलाच्या अडचणी समजुन घेतल्या सोबतच इतर योजनेबद्दल सुध्दा मार्गदर्शन केले. यावेळी बहुसंख्येनी महिला भगीनी उपस्थिती होत्या आणि त्यांना मिळालेल्या योजनेच्या माहिती बाबत त्यांनी मान्यवरांचे आभार मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment