Ads

भाजपाची विधानसभेची उमेदवारी ही आर्णी विधानसभेत कोणाला

घाटंजी तालुका प्रतिनिधी:-
लोकसभा निवडणुकीत निकाल पाहता त्या निकालावरून पराभवाची कारण तपासून विधानसभेमध्ये कशी विजयश्री खेचून आणून लोकसभेचा बदला पूर्णतवास नेण्याकरीता भाजपाने कर्तव्यशून्य असलेल्या विद्यमान आमदारांना तिकीट न देण्याच्या जणू काही अघोषित आदेशच सर्वत्र फिरू लागल्याने भाजपाची तिकीट आपल्यालाच मिळावी या उद्देशाने अनेक उमेदवारांनी वरिष्ठाकडे मागणी केली असल्याचे दिसते यात आपणच योग्य उमेदवार होऊ शकतो हे पक्षाच्या वरिष्ठांना अवगत करत असल्याचे कळते.
Who is BJP's candidate for the Legislative Assembly?
कोणताही राष्ट्रीय पक्ष असो उमेदवारी देताना त्या उमेदवाराचे चारित्र्य शिक्षण समाजात असलेले स्थान यापूर्वी पक्षासाठी कितपत कार्य केले त्यांचा समाज कार्यकर्ता वर्ग काय म्हणतो याची इंतभूत गुप्तपणे माहिती संकलित करूनच उमेदवारी जाहीर करतो त्यात भाजपाकडून निवडणूक लढण्यास किंवा वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात तरबेज असणारे नितीन रामचंद्र मडावी यांचा जन्म घाटंजी तालुक्यात असला तरी त्यांची राजकीय परिस्थिती ही वर्धा जिल्ह्यातून सुरू झाली त्यांनी जिल्हा परिषद वर्धा चे अध्यक्ष सुद्धा भूषविले आहे जिल्ह्यात पक्षाचा विचार पोहोचविणारे आदिवासी आघाडी चे प्रदेश सरचिटणीस पदाची त्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पडली तसेच भाजपाचे प्रतीक गजानन कुळसंगे रा. पांढरकवडा उच्च विद्या विभूषित संयमी स्वभावाचे ज्यांनी अनेक वर्षापासून भाजपामध्ये आदिवासी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष आर्णी विधानसभा बुथ रचना संयोजक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आर्णी विधानसभा विस्तारक म्हणून कार्य केले पक्षाच्या विविध उपक्रमात अभियानात संयोजक सहसंयोजक संघटनात्मक बांधणीत महत्त्वाचा वाटा असणारे पक्षाचा आदेश शिरसावंद्य करणारे आहेत या विधानसभे यांचे कार्य चांगले आहे अशी चर्चा कार्यकर्ता करत आहे त्यानंतर मोहन कनाके पांढरकवडा आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव कार्य करणारे हेही निष्ठावंत पैकी एक आहे तसेच घाटंजी तालुकातील शिरोली येथील कैलास दादाराव कोरवते यांचे सुद्धा समाजकार्य चांगले असून त्यांचे गोंडी भाषेवर प्रभुत्व असणारे परंतु ते अजित दादा गटाकडून उमेदवारीच्या रिंगणात आहे तर रितेश परचाके हे सुद्धा स्थानिक असून त्यांचे समाजकार्य चालू आहे ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहे तसेच सौ निता आ. मडावी (बोरेले) याही सामाजिक क्षेत्रांमध्ये अग्रसेर आहे आर्णी येथील डॉ. विष्णू उकंडे हेही स्पर्धेत आहे त्यांनी आरोग्य शिबिर घेऊन आपली चूनूक दाखवून दिली परंतु ही जागा भाजपाच्या वाटेला असल्याने त्यांनाही प्रश्न पडला असेल
वरील एकंदरीत पाहता सर्व उमेदवार हे स्थानिकामध्ये मोडत असल्याने भाजपा ही कोणाला उमेदवारी बहाल करतील याकडे जनतेच्या नजरा लागले आहे तेव्हा भाजप ही काँग्रेसच्या उमेदवारावर वरचढ होईलच अशा उमेदवाराला उमेदवारी दिली असा कयास येथील जनता लावत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment