Ads

दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

चंद्रपुर:- आज दि. 10/08/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे पथक हे पोस्टे रामनगर परिसरात गुन्हेगार शोध कामी पेट्रोलीग करीत असतांना मुखबिर द्वारे खात्रीशिर खबर मिळाली की, रेकॉर्डवरिल मोसा गुन्हेगार सुमोहीत उर्फ गोलु हा बिनाकागदपत्राची एक काळया रंगाची फॅशन प्रो मो.सा.कंमाकं एम एच 29 ए एक्स 0349 ही गाडी चोरी करून विकी करण्याच्या उददेशाने चोर खिडकी जवळ चंद्रपुर परिसरात संशयास्पद स्थितित फिरत आहे.
Two-wheeler thief was arrested by the local crime branch
अशी खबर मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन त्यारा ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील मोटारसायकल चे कागदपत्राबाबत विचारपुस केली असता उडवाउडवीचे व असमाधानाकारक उत्तरे देवुन कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगीतले. त्यास विश्वासात घेवुन सविस्तर विचारपुस केली असता त्याने सदर गाडी ही अंदाजे चार दिवसा अगोदर सांयकाळी अयप्पा मंदीरा तुकूम, चंद्रपुर येथिल पोहेकर जिम जवळून चोरलेली आहे.

तसेच नमुद आरोपीस आणखी ईतर गुन्हयासबंधात विचारणा केली असता आणखी तिन मोटारसायकल त्यापैकी एक मोसा हि अंदाजे चार पाच दिवसापुर्वी रामनगर हद्दीतून बजाज पल्सर लाल काळया रंगाची, व एक दिवसापुर्वी भद्रावती परिसरातुन एक हिरो होन्डा स्पेलडर काळ्या रंगाची मोटारसायकल चोरली तसेच एक बेवारस होंडा अॅक्टीव्हा बाबुपेठ मधुन चोरून नेली असे मोटारसायकल चोरून तिन्ही मोसा. पशुवैदयकिय दवाखाना चे पार्कंग मध्ये (चोर खिडकी जवळ) लपवुन ठेवली आहे. आम्ही सदर गाड्याचे गि-हाईक मिळाल्यानंतर गाड्या विकत होतो असे सांगितल्याने नमुद ठिकाणावरून तिन्ही मोटारसायकल हया पंचासमक्ष जप्त करण्यात आले ते खालील प्रमाणे.
1) पो.स्टे. रामनगर :- कि 20,000/- रू अप क 772/24 कलम 303 (2) भान्यास मधील एक काळ्या रंगाची पॅशन प्रो गाडी कंमाकं एम एच 29 ए एक्स 0349 जिचा चेसीस कं MBLHA10BHGHA56411, इंजीन नं HA10EVGHA56749 असलेली
2) पो.स्टे. रामनगर :- कि 50,000/- रू अप क 780/24 कलम 303 (2) भान्यास मधील एक काळ्या रंगाची लाल काळया रंगाची बजाज पल्सर कंमाकं एम एच 34 सि.जी. 2530 जिचा चेसीस कं MD2A11CX9PCX44910, ईजीन नं DHXCPF01147 असलेली
3) पो.स्टे .भद्रावती :- कि 20,000/-रू अप क / 24 कलम 303 (2) भान्यास मधील एक काळया रंगाची हिरो कंपणीची स्प्लेंडर प्लस कंमाकं एम एच 34 एस 1202 जिचा चेसीस कं 04L16C18218, इंजीन नं 04L15M28849 असलेली
4) बेवारस :- कि 30,000/-रू :- पांढ-या रंगाची होंडा अॅक्टीव्हा मोपोड गाडी कमांक एम.एच. 34 ए डब्लु 5282 कमाकाची जिचा चेसीस कं ME4JF504JF7094096 इंजीन नं JF50E72294186 असलेलीअसा एकुण 1,20,00,0/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला. वरील नमुद आरोपी व मुद्देमाल पोस्टे रामनगर येथे पुढील कार्यवाही करीता ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे, पोलीस उप निरीक्षक विनोद भुरले, पोहवा दिपक डोंगरे, नापोकों संतोष येलपूलवार, पो.कॉ. नितीन रायपुरे.. गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, उमेश रोडे यांनी केली असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर येथील पोलीस करीत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment