Ads

शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित द्या

वरोरा सादिक़ थैम : शेतकऱ्यांना पिक विमा आज पर्यंत मिळाळेली नसल्याने व वरोरा तालुक्यातील जवळपास २० हजार शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज विमा कंपनीने अपात्र ठरविले आहेत. पिक विमा त्वरित मिळावा व अपात्र झालेले अर्ज पात्र करण्याकरीता वरोरा तहसिलदारांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज 1 ऑगस्ट रोज गुरुवारला निवेदन देण्यात आले.
Pay the crop insurance amount to the farmers quickly
वरोरा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाच्या आवाहनावरून 2023 खरीप हंगामात कापूस,सोयाबिन तूर इत्यादी पिकांचा विमा प्रती हे. १ रु. प्रमाणे योजनेत ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे काढला.
वरोरा-भद्रावती तालुक्यातील नद्या कोंडा नाला, इरई नदी, शिरना नदी, दैवल नाला व छोट्या मोठ्या नाल्यांना जुलै, आगस्ट, सप्टेंबर मध्ये आलेला पूर,सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे सोयाबिन वर आलेला मोझॉक किड रोग इत्यादी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिक विमा नुकसान नियमानुसार ७२ तासात पूर्ण सुचना कंपनी कडे ऑनलाईन करण्यात आल्या. यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या नुकसानी प्रमाणे २५ टक्के अग्रीम सोयाबिनचे देण्यात आले पण आजपर्यंत ७५ टक्के रक्कम अजूनही मिळाली नाही. तूर, कापुस पिकाचे २०२३-२४ हंगाम असूनही विमा कंपनीने भरपाई दिलेली नाही.
शेतकऱ्यांनी पिक संरक्षणाकरीता विमा काढला, भरपाई करीता तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी कृषी व विमा कार्यालयात हेलपाट्या मारुन थकले असून यांचा मानसिक त्रास शेतकऱ्यांना झाला.

त्यामुळे लवकरात लवकर पिक विम्याची उर्वरीत ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी व अपात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची चौकशी करुन पात्र करण्यात यावे,या मागण्या येत्या ७ दिवसांमध्ये पूर्ण न झाल्यास संपूर्ण तालुक्यामध्ये पिक विमा कंपणी विरोधात आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा भारतीय जनता पक्षाचे वरोरा
विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रचार प्रमुख डॉ रमेश राजूरकर यांनी दिला.
यावेळी प्रदेश भाजपा अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजयुमोचे प्रदेश सचिव करण देवतळे तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, शहर अध्यक्ष सुरेश महाजन, जिप सदस्य राजू गायकवाड, ओ.बी.सी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे, जिल्हा संयोजक वैद्यकिय आघाडी डॉ. सागर वझे, राजु दोडके, विशाल पारखी, उमेश माहुरे, गजानन राऊत, दिपक चव्हान, देविदास ताजणे, विनोद लोहकरे, मधुसुदन टिपले, सारंग किन्हेकर, विजय पावडे, राजुभाऊ दाते, प्रकाश दुर्गपुरोहित, निंबाळकरजी, शरद कातोरे, प्रमोद ढाकणे, शहर अध्यक्ष संजय राम, जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी अनिकेत नाकाडे,भाजयुमोचे तालुका महामंत्री सुरज धात्रक तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment