Ads

चंद्रपूर जागृती मशाल मंच द्वारा आयोजित "Daughters of Chandrapur-Reclaim the Night" 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 2024 ला मध्यरात्री रॅलीचे आयोजन Organized "Daughters of Chandrapur-Reclaim the Night" 31 August and 1 September 2024 midnight rally organized by Chandrapur Jagruti Mashal Manch

चंद्रपुर :-नव्याने स्थापन झालेल्या चंद्रपुर जागृती मशाल मंच द्वारा स्त्री सुरक्षेसाठी दि.३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२४ च्या मध्यरात्री चंद्रपूरच्या गांधी चौकापासून प्रियदर्शिनी चौकापर्यंत मध्यरात्रीची रॅलीचे (Midnight March) आयोजन करण्यात आले आहे.
Organized "Daughters of Chandrapur-Reclaim the Night" 31 August and 1 September 2024 midnight rally organized by Chandrapur Jagruti Mashal Manch
संध्याकाळी ९.३० वाजता गांधी चौकात एकत्र येऊन रॅली मध्यरात्री प्रियदर्शिनी चौकात पोहोचेल. प्रियदर्शिनी चौकात सर्वजण एकत्र येऊन महिलांच्या सुरक्षेची शपथ घेतील आणि राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप करतील.

या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाचे पूर्ण सहकार्य लाभणार आहे. कार्यक्रमाला खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, पालकमंत्री मा.सुधीर मुनगंटीवार, मा. आमदार किशोर जोरगेवर, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याचळवळीत सहभागी होण्यासाठी मंच सर्व शैक्षणिक संस्थांना, व्यावसायिक संस्थांना, कामगार संघटनांना, सामाजिक आणि सरकारी संस्थांना तसेच जागरूक नागरिकांना आवाहन करीत आहे.

आपण दररोज महिलांविरुद्ध होणाऱ्या छळाच्या बातम्या ऐकतो. छेडछाड असो, पाठलाग असो किंवा बलात्कार असो. या मार्चचे उ‌द्दिष्ट हे आहे की चंद्रपूरच्या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ त्यांच्या कुटुंबाची नसून चंद्रपूरच्या सर्व नागरिकांची आहे. चंद्रपूरमध्ये प्रत्येक मुलगी आपलीच मुलगी आहे, ही भावना या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे.

महिलांच्या सुरक्षेबद्दल संवेदनशील असलेल्या सर्व नागरिकांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन ऍड प्रीतिषा साधना ,ऍड पारोमिता गोस्वामी, अश्विनी खोब्रागडे ने आयोजित पत्रकार परिषद मध्ये केले.

रॅलीचे उ‌द्देश आहे1. जागरुकता वाढवणेः एक मजबूत सामुदायिक भावना निर्माण करणे आणि महिलांच्या सुरक्षा आणि हक्कांबद्दल जागरुकता पसरवणे.2. एकजुटता दाखवणेः चंद्रपूरचे नागरिक महिलांच्या सुरक्षेच्या समर्थनार्थ एकत्र आहेत हे दाखवणे, त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानणे.3. सुरक्षेला प्रोत्साहनदेणेः संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला, विशेषतः रात्री उशिरा काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटावे याची सार्वजनिक हमी देणे. याव्यतिरिक्त, केवळ विशिष्ट संस्थांचे कर्मचारीच नव्हे तर संपूर्ण समाजाने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. केवळ कामकाजी महिलाच नाही तर प्रत्येक महिलेला रात्रीच्या वेळी कोणत्याही भीतीशिवाय स्वतंत्रपणे फिरण्याचा अधिकार असला पाहिजे.

या उद्देशांच्या पार्श्वभूमीवर ही मध्यरात्रीची रॅली आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला चंद्रपूरचे नागरिक पुरुष आणि महिला दोघेही सहभागी होतील, तसेच जिल्हा प्रशासनही सहभागी - होऊन चंद्रपूरच्या मुलींना आश्वस्त करेल की "तुम्ही घाबरू नको -आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत" आणि  शहराच्या रात्री पुरुषांसारख्याच त्यांच्याही आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment