Ads

एम.पी.एस.सी. उमेदवारांना न्याय द्या.Give Justice to MPSC candidates.

चंद्रपुर :-एम.पी.एस.सी. लिपिक पदाची परीक्षेची जाहिरात जाने. 2023 रोजी प्रसिध्द होऊन जुलै 2024 रोजी कौशल्या चाचणी देखील पुर्ण होऊन अद्यापही नियुक्ती यादी जाहीर न झाल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहुन एम.पी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.
Give Justice to MPSC candidates.
मागील 19 महिन्यांपासून एम.पी.एस.सी. विद्यार्थ्यांची लिपीक संवर्गातील परीक्षेतील विविध टप्पे पुर्ण केले आहे. अंतिम टप्प्यातील कौशल्य चाचणी पुर्ण झाली असून अद्यापही निकाल घोषित न झाल्याने संबंधित भरती प्रक्रीयेतील विद्यार्थ्यांनी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन निवेदन देत आपली समस्या मांडली. यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून एम.पी.एस.सी. लिपीक संवर्गातील उमेदवारांची निवड यादी तात्काळ जाहीर करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. अनेक उमेदवार अनेक वर्षांपासून अभ्यास करीत असून लवकर उमेदवारी जाहीर न झाल्याने वयोमर्यादा देखील ओलांडण्याची भिती उमेदवारांना आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात खासदार प्रतिभा धानोरकर या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे उमेदवारांना सांगितले.   

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment