Ads

रक्षाबंधन निमित्य पोलीस स्टेशन राजुरा येथे वृक्ष कुंड्याची भेट.

राजुरा :-नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे तर्फे रक्षाबंधन निमित्ताने राजुरा पोलीस स्टेशन येथे वृक्ष, कुंड्या भेट देण्यात आल्या.
Gift of tree pots at Police Station Rajura on the occasion of Rakshabandhan.
यावेळी निशा जी. भुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राजुरा तालुका अध्यक्ष अनंत डोंगे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बबलू चव्हाण, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. रक्षाबंधन निमित्ताने राजुरा पोलीस स्टेशन येथे या कुंड्या व वृक्ष भेट देण्यात आले. यावेळी योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन राजुरा यांच्या मार्गदर्शनात आणी स्वतः परिश्रम घेऊन आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन परिसरात विविध फुलझाडे तसेच वृक्षारोपण करीत असल्याची माहिती निशा भुते यांनी दिली. भविष्यात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सहकार्याने पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण व बगीचा निर्मिती याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली. यापूर्वी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने राजुरा येथील तहसील कार्यालय व उप जिल्हा रुग्णालय येथे बगीचा तयार केला आहे. संस्थेच्या पदाधिकारी, सदस्य, संघटक आपल्या वाढदिवस आणी इतरही स्मृतिदिनांची आठवण, स्मरण म्हणून स्वतः निधी संकलन करीत या सामाजिक व पर्यावरणीय, मानवता विकासाच्या कार्यात आपले कर्तव्य म्हणून हातभार लावत असतात हे विशेष .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment