Ads

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्याध्यक्षपदी बेबीताई उईके यांची निवड

चंद्रपुर:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय. शरदचंद्र पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब विदर्भाचे नेते माजी.गृहमंत्री अनिलबाबू देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुक लक्षात घेत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते राजेंद्रभाऊ वैद्य यांची बायपास सर्जरी झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आरामाची गरज असल्यामुळे जिल्ह्याची जबाबदारी इतर कोणाकडे देणे आवश्यक होते त्यानुसार चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ बेबीताई उईके यांचे कार्य आणि पक्ष संघटन वाढीकरता दिलेल्या योगदानाबद्दल वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकीत चंद्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी वरिष्ठांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली कार्याध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आणि माजी गृहमंत्री श्री अनिलबाबू देशमुख साहेब यांच्या हस्ते नागपूर येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये देण्यात आले.
Election of Babytai Uike as District Working President of Chandrapur District Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar).
ताईंच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीकरिता निश्चितच गती मिळेल
यावेळेस शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल युवक जिल्हाध्यक्ष सुमित समर्थ प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख, युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकुर युवक शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मल्हारप वरोरा तालुका अध्यक्ष अविनाश ढेगडे भद्रावती तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर,राजू वर्गणे, नगाजी निंबाळकर अरुण सहारे , माजी . नगरसेवक विनोद लभाने, मारोती झाडे, परब गीरडकर वरोरा तालुका अध्यक्ष सुशीला तेलमोरे ,मुल शहराध्यक्ष अर्चना चावरे , वरोरा शहर बल्लारपूर शहर कार्याध्यक्ष शहजादी अन्सारी वरोरा शहर कार्याध्यक्ष मोनाली काकडे, छायाताई चौधरी, अर्चना वाटकर, माजी ग्रामपंचायत सदस्य ऊर्जानगर किसन आरदळे, प्रवीण आरपेल्ली, राहुल मोहुर्ले यांची प्रामुख्याने उपस्थित होते.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment