Ads

वरोरा येथील नामवंत विद्यालयात शिक्षकांने केला विनयभंग

सादिक़ थैम वरोरा:-
वरोरा शहरातील नामवंत महाविद्यालयातील विद्यार्थिनी सोबत शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली.
Teachers molested a famous school in warora
वरोरा शहरातील नगरपालिका जवळ असलेल्या नामवंत महाविद्यालयात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला रूम वरती बोलून विनयभंग केल्याचा प्रकार दोन शिक्षकांनी केला आहे. या प्रकरणात दोन शिक्षकांवरती कलम 74 विनयभंग व पास्को लहान मुलीचा लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन्हीही शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून वरोरा पोलीस या दोन्ही गुरुजींचा शोध घेत आहेत. गुरुजी सध्या फरार असून समाज माध्यमावर या वर्तणुकीचा निषेध दर्शवला जात आहे.

नामांकित महाविद्यालयातील शिक्षक आरोपी प्रमोद बेलेकर व धनंजय पारखे घनिष्ठ मित्र आहेत. बेलेकर गुरुजी यांचा वाढदिवस असल्याने साजरा करण्यासाठी विद्यार्थिनी शुभेच्छा देण्यासाठी स्टॉप रूम मध्ये पोहचले त्यावेळी मित्र शिक्षकाने संध्याकाळी पार्टी देण्याचे कबूल केले. हा सगळा प्रकार स्टॉप मध्ये बसून असणारे सहकारी मित्र यांना चांगलाच माहीत आहे. या प्रकरणातील साक्ष पोलिसांकडे आहे. यानंतर मित्र शिक्षकाने विद्यार्थीनीला फोन करून रूमवर बोलावून घेतले. साडेचार वाजता च्या दरम्यान विद्यार्थिनी धनंजय पारखे गुरुजी यांच्या रूमवर विद्यार्थिनी आली. लगेच बेलेकर गुरुजीचा फोन विद्यार्थिनीला आला. यानंतर रूमवर विद्यार्थिनी आणि हे दोन गुरुजी वाढदिवसानिमित्त बोलले. बेलेकर गुरुजींनी वाढदिवसानिमित्त डेरी मिल्कचे चॉकलेट विद्यार्थिनीला दिले. लगेच गुरुजींनी रिटर्न गिफ्ट मागितले. रिटर्न गिफ्ट मध्ये मिठी मारण्याचा प्रस्ताव विद्यार्थिनी पुढे ठेवण्यात आला. विद्यार्थिनी ते नाकारले तेव्हा गुरुजींनी हात पकडून जबरदस्ती मिठी देण्याचा प्रयत्न केला.
धास्तावलेल्या विद्यार्थिनी ने घरचा रस्ता पकडत हा सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला.

हा सगळा प्रकार शिक्षक पेशातील आणि पत्रकार पेशातील व्यक्तींनी करावा या मानसिकतेला समाजातून मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जात आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment