Ads

छत्रपती शिवरायांच्या पुतळा बांधकामातील भ्रष्ट्राचार्‍यांना कठोर शिक्षा द्यावी- डाॅ.चेतन खुटेमाटे.

वरोरा-छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असुन ते सर्वांसाठीअभिमानाचा,स्वाभिमानाचा,अस्मितेचा विषय आहे,शिवरायांच्या नावावर महाराष्ट्र व देशात सत्तेवर आलेले सरकार आठ महिण्यापुर्वी जलदुर्ग,सिंधुदुर्ग शेजारी राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधला व तो एकाएकी पडला.
The corrupt officials in the construction of the statue of Chhatrapati Shivaji should be severely punished - Dr. Chetan Khutemate.
त्या पुतळ्याचे उदघाटन देशाचे पंत प्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले,पुतळ्याचे पुर्ण बांधकाम भारतीय नौदलाच्या अखत्यारीत असतांना फक्त आठ महिण्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडवा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे.या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तिव्र संताप असुन मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळे या घटनेची दखल घेवुन बांधकाम विभाग,त्यांचे सहकारी ठेकेदार आणी या घटनेशी संबधित सर्वांवर ताबडतोब कारवाई करुन अटक करावी अन्यथा शिव महोत्सव समिती संपूर्ण महाराष्ट्रात तिव्र आंदोलन उभे करुन शासनाच्या धोरणाचा अजुन मोठ्या प्रमाणात निषेध करु या विषयाचे निवेदन मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसिलदार वरोरा यांच्या मार्फत नायब तहसिलदार यांना निवेदन देतांना शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष डाॅ. चेतन खुटेमाटे.शिव महोत्सव समिती वरोराचे संयोजक संदिप सोनेकर,चंद्रशेखर झाडे,संकेत गोहकार,स्वप्निल टाले,अनुप खुटेमाटे , निलेश खुटेमाटे,संजय चिडे, सचिन खुटेमाटे, अमित डोंगे उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment