Ads

भद्रावती रोटरी तथा इनरव्हिल क्लबचे कार्य प्रशंसनीय-अनील धानोरकर. 

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती रोटरी तथा इनरव्हिल क्लबच्या माध्यमातून सामाजीक बांधिलकीचे भान ठेऊन विविध सामाजीक कार्य केल्या जातात.दोन्ही क्लबचे कार्य हे अत्यंत प्रशंसनीय असुन हे कार्य पुढेही तेवत राहणार असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा मावळते भद्रावती रोटरी क्लबचे अध्यक्ष अनील धानोरकर यांनी केले.
Bhadravati Rotary and Innerville Club work commendable-Anil Dhanorkar.
स्थानीक स्वागत सेलिब्रेशन सभागृहात भद्रावती रोटरी क्लब व इनरव्हिल क्लबचा पदग्रहण समारंभ पार पडला त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर अनील धानोरकर, अरुण कावडकर,रमा गर्ग,किशोर खंडाळकर, सुधीर पारधी, अरुण देशमुख, हनुमान घोटेकर,प्रेमा पोटदुखे,सुनीता खंडाळकर, स्वाती चारी,विक्रांत बिसेन आदी मान्यवर ऊपस्थीत होते.सदर पदग्रहण समारंभात भद्रावती रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी किशोर खंडाळकर यांची तर सचिवपदी आत्माराम देशमुख यांची निवड करण्यात आली. याशिवाय प्रोजेक्ट सेक्रेटरी म्हणून विक्रांत बिसेन यांची तर कोषाध्यक्ष म्हणून हनुमान घोटेकर यांची निवड करण्यात आली.तर इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षपदी प्रेमा पोटदुखे यांची तर सचिवपदी सुनंदा खंडाळकर यांची निवड करण्यात आली.यावेळी रोटरीच्या छत्री वाटप कार्यक्रमात सहकार्य केल्याबद्दल विवीध शाळा तथा महाविद्यालयांच्या प्राचार्य व मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन सचिन सरपटवार यांनी तर आभार सुधीर पारधी यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अब्बास अजाणी, किशोर पत्तीवार, विवेक आकोजवार,किशोर भोस्कर,आनंद क्षिरसागर,मनोहर नागपुरे तथा रोटरी व इनरव्हिल क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment