Ads

बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बंद व निषेध मोर्चा Bandh and protest march against atrocities on Hindus in Bangladesh

सादिक थैम वरोरा :  बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारादरम्यान तिथे राहणाऱ्या हिंदू समाज बांधवांवर सातत्याने होणाऱ्या अन्याय व  अत्याचाराविरोधात वरोरा येथे आज 16 ऑगस्ट रोज शुक्रवारला सकल हिंदू समाजातर्फे पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने व शैक्षणिक संस्था पूर्णतः बंद होत्या. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत या बंदचे आव्हान करण्यात आले होते. शहरातील व्यापाऱ्यांनी आपआपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत ते निषेध मोर्चात सहभागी झाले होते.
Bandh and protest march against atrocities on Hindus in Bangladesh
        यादरम्यान येथील श्रीराम मंदिर देवस्थानातून एक निषेध मोर्चा येथील प्रमुख मार्गावरून फिरत तहसील कार्यालयावर नेण्यात आला. हा मोर्चा येथील गांधी चौकात येतात तेथे एक जाहीर सभा घेण्यात आली या सभेत भद्रावतीचे विवेक सरपटवार यांनी मार्गदर्शन केले.सभेचे संचलन पराग दवंडे यांनी केले. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर तेथे देशाच्या राष्ट्रपती यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसीलदारांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार लोखंडे यांनी स्वीकारले. या मोर्चा व बंदमध्ये सर्व पक्षाचे तसेच समस्त हिंदू संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त  होता.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment