बल्लारपूर :-रागाच्या भरात पत्नीने पतीचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरालगत असलेल्या नांदगाव पोडे येथे घडली. पती पत्नीचा शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून खून झाला
The wife killed her husband with a sharp weapon
यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील अमोल मंगल पोडे 38 रा. नांदगाव पोडे यांच्या पत्नी लक्ष्मी पोडे यांनी कोंबड्याचा कातरने खून केला आहे. अमोल त्याची दोन मुले आणि पत्नीसह राहत होता. अमोलला दारूचे व्यसन होते, त्यामुळे पत्नीसोबत नेहमी वाद होत होते. बुधवारी रात्री 2 वाजता पती-पत्नीमध्ये वाद झाला. ज्यामध्ये त्रासलेल्या पत्नीने अमोलच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. ज्यामध्ये अमोलच्या मृत्यूसोबतच पत्नी लक्ष्मीने स्वत: आत्मसमर्पण करून चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.
0 comments:
Post a Comment