Ads

घाटंजी अवैद्य वृक्षतोड प्रकरणातील तस्करांचा काही तासात लावला छडा...

घाटंजी तालुका प्रतिनिधी:-
पांढरकवडा वनविभागतील घाटंजी वनपरिक्षेत्रामधील उंदरणी बिट कक्ष क्र.२३८ मध्ये अवैध्य पणे सागवान आडजात तस्कर होणार असल्यासंबंधी दिनांक २२ जुलै २०३५ रोजी गोपनीय माहिती मिळाल्या वरून रात्री १०:२० वाजता दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे कक्ष क्रमांक २३८ मधील जंगल क्षेत्रात वन कर्मचारी हे दबा धरून बसले असता अचानक पणे मध्यरात्री २:३० वाजताचे दरम्यान आरोपी व त्यांची टोळी एक चार चाकी वाहनाने घटनास्थळावर पोहोचले घटनास्थळावर गाडी ठेवून सागवान माल अवद्यपणे तोड केलेला माल चार चाकी वाहनांमध्ये भरत असताना वन कर्मचाऱ्यांनी आरोपी व त्यांच्या टोळीवर धाव घेतली रात्री दाट अंधारामध्ये आरोपी व त्यांच्या टोळी मागे वन कर्मचारी गेले असता ते आरोपी घटनास्थळावरून सैरावैरा पळून गेले सदर ठिकाणावरून चार चाकी वाहन व सागवान माल जप्त करण्यात आले.
The traffickers in the Ghatji illegal tree Cutting case were caught in a few hours...
उंदरणी बीटामध्ये झालेल्या घटनेची सखोल चौकशी केली असता सदर ठिकाणावर अनोळखी वाहन मारुती स्विफ्ट संशयितपणे ये जा करत होती त्या अनुषंगाने सदर वाहनाचा पाठलाग करून व त्या वाहनांची चौकशी केली असता आरोपी नामे मोहनराज ओमप्रकाश पेटेवार रा. घाटी हे आहे अशी चौकशीत कळले सदर आरोपीला चौकशीला वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) घाटंजी कार्यालयात आणले असता सदर आरोपीने उंदरणी बीटातील कक्ष क्रमांक २३८ पार्डी बिटातील कक्ष क्रमांक २२३ मध्ये व अशा अनेक ठिकाणी इतरांच्या साह्याने अवैध्य पणे सागवान व आड जात (खैर) माल तोड करून वाहतूक करत असल्याचे त्यांनी कबुली दिली. सदर प्रकरणात सहकारी निलेश दादाराव भोयर रा. कोंडजई हे असल्याचे कळाले यावरून या प्रकरणात दोन्ही आरोपींची चौकशी केली असता दोन्ही आरोपीने मुख्य सूत्रधार मोबिन मोहम्मद बुलंदशहा राहणार घाटी आहे.हे कळाले त्यानुसार मोबीन शहा ला चौकशी करिता ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे वाहन टाटा ४०७ या वाहनाने शासकीय जंगल व खाजगी क्षेत्रातील खैरमाल वाहतूक केला असल्याचे कबुली दिली त्यानुसार त्याला अटक करून व त्याचे वाहन जप्त करून वरील आरोपीस भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २७,( १) फ,ड कलम ४२, ४२,५२ नुसार मा.वि. न्यायादंडाधिकारी प्रथम श्रेणी घाटंजी येथे हजर केले. सदरची कारवाई श्री. किरण जगताप उपवनसंरक्षक पांढरकवडा व श्री रवी कोंडावार सहाय्यक वनसंरक्षक पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री आर. आर. जाधव व श्री विकेश ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी परीक्षाविधीन (सलग्न) घाटंजी क्षेत्र सहायक सी.एम. लहानके जीआर दर्वे वनरक्षक कु. पी. आर. आत्राम डी. यु. वानखेडे व घाटंजी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी पार पाडली अशाप्रकारे अवैध सागवान तस्कराची घटना घडत असेल तर तालुक्यातील सर्व सजग नागरिकांनी १९३६ (Hello Forest) या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आव्हान घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment