सादिक थैम :- वरोरा शहरातील शिवाजी प्रभाग परिसरात जबरदस्त हादरे बसत असून या हाद-यामुळे सध्या कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसली तरी भविष्यात ही शक्यता नाकारता येत नाही. या हाद-यांनी मात्र लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.मात्र हे हादरे नेमके कशाचे याबद्दल नागरिकात संभ्रम आहे.
हे हादरे रोज हे अडीच ते तीनच्या दरम्यान बसत असतात. आज 23 जुलै रोज मंगळवारला स्नेहांकित नगर, ओमनगर,आंबेकर लेआऊट या भागात तीन वाजून दहा मिनिटांनी बसलेला हादरा हा तर जास्त तीव्रतेचा होता. या हाद-यामुळे दरवाजे, खिडक्या व घरही हलायला लागते. या हादऱ्यांमुळे घराला भेगा पडण्याची तसेच जीवहानी होण्याची शक्यता आहे. मात्र हे हादरे भूकंपाचे की अन्य कोणत्या कारणाचे हे नागरिकांना कळू शकत नाही.
वरोरा येथून सात किलोमीटर अंतरावर एकोणा येथे दगडी कोळश्याची खुली खाण आहे. या खाणीत ब्लास्टिंग केले जाते. या ब्लास्टिंग मुळे हे हादरे बसत असावे असे म्हटले जाते.परंतु वेकोली पदाधिकाऱ्यांनी आमच्या ब्लास्टिंगमुळे वरोरा शहरापर्यंत हादरे बसू शकत नाही असा दावा केला आहे.
मग या हाद-यांनी नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार हा प्रश्न निर्माण होत आहे.
हे हादरे नेमके कशाचे हे तपासणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार हे ठरवता येऊ शकणार नाही. म्हणून ब्लास्टिंगमुळे हे हादरे बसत असेल तर वेकोली प्रशासनाला शासकीय यंत्रणेने समज देणे गरजेचे आहे.
या हाद-यांमुळे भविष्यात घरांचे नुकसान होणे व एखाद्या वेळेस जीवहानी होणे असे धोके संभवू शकतात. यामुळे यावर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.या हाद-यामुळे मात्र नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हे मात्र निश्चित.
0 comments:
Post a Comment