सादिक थैम:-वरोरा व भद्रावती तालुक्यातील विद्यार्थ्यांना बस सेवेत होणाऱ्या समस्यांना घेऊन भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज 12 जुलै रोज शुक्रवारला वरोरा बस आगर प्रमुखांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना सतावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली.
भद्रावती व वरोरा येथे शिक्षणासाठी ग्रामीण भागातून दररोज येणाऱ्या विद्यार्थ्यांना बससाठी बरेच ताटकळत राहावे लागते.तसेच बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबले जातात. यासारख्या समस्येबाबत बस आगर प्रमुखांना निवेदन देऊन सुद्धा समस्यांचे निराकरण होत नसल्याने भाजपचे प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष व वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने येथील बस आगर प्रमुख पुण्यवर्धन वर्धेकर यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्येबद्दल विस्तृत चर्चा केली.
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ये जा करण्याकरता बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शिष्टमंडळाने आगार प्रमुखांना केली.
गावात शिक्षणाची पुरेशी सोय नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागते.मात्र त्यांना बसने प्रवास करत असताना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. काही गावात बसच जात नसल्याने विद्यार्थ्यांना पायदळ प्रवास करत मोठी कसरत करावी लागत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी बस थांबा असून सुद्धा बस थांबत नाही तर बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबणे आदी समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांची सोय करण्याची विनंती शिष्टमंडळाने आगार प्रमुखांना करत विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली.
सध्या वरोरा बस आगारात 35 बसेस असून त्यापैकी नऊ बसेस पंढरपूर यात्रेसाठी देण्यात देण्यात आल्याने समस्या निर्माण निर्माण झाली आहे. 21 जुलै नंतर यावर आपण योग्य नियोजन करून तोडगा काढण्याची माहिती यावेळी बस आगर प्रमुख पुण्यवर्धन वर्धेकर यांनी शिष्टमंडळाला दिले दिली.
भाजप प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळात वरोरा येथील आशिष ठाकरे, खुशाल बावणे, बाबू शेख, आतिश बोरा,कादर शेख तर भद्रावतीचे रवी पवार, अरुण मेदमवार, मनोज शेंडे, सुरेंद्र घुगल, शैलेंद्र मेश्राम, रोहित पाराशर आदींचा समावेश होता.
0 comments:
Post a Comment