वरोरा / भद्रावती : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जिल्हाप्रमुख तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग,मुकबधीर,अंध विद्यार्थी तसेच रुग्णांना अल्पोहर वाटप करून साजरा करण्यात आला.
Shiv Sena (UBT) office bearers celebrated party chief Uddhav Thackeray's birthday with disabled, blind, deaf and dumb children.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात वरोरा - भद्रावती विधानसभेत विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. दिनांक २७ जुलै रोजी आनंदवन येथील अंध मुकबधीर, कर्णबधीर विद्यार्थांन सोबत वाढदिवस साजरा करत त्यांना अल्पोहराचे वाटप केले.तसेच येथील आनंदवन रुग्णालयातील रुग्णाची विचारपुर करत त्यांना सुद्धा अल्पोहार वाटप करण्यात आला. यासोबतच भद्रावती ग्रामीण रुग्णालय, गजानन महाराज मतिमंद विद्यालय तसेच प्रेरणा अंध विद्यालय निंबाळा येथील विद्यार्थ्यांना आल्पोहर वाटप केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, विधानसभा संघटक सुधाकर मिलमीले, शिवदूत बंडू डाखरे, माजी नगरसेवक दिनेश यादव,माजी नगरसेवक किशोर टिपले, शहर प्रमुख संदीप मेश्राम,उपशहर प्रमुख मनीष दोहतरे,ज्येष्ठ शिवसैनिक अनिल गाडगे,महेश जिवतोडे, युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर, माजी नगरसेविका शुषमा भोयर, वंदना डाखरे,कीर्ती पांडे, बंडू चटपल्ली,जितेंद्र गुल्हानी, अरविंद खोबरे,राजू खबाने,शंकर ठाकरे, वैभव डाहुले व आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment