Ads

Rte कायद्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेने नाकारल्याने पालक संतप्त

वरोरा तालुका प्रतिनिधी :-वरोरा तालुक्यातील संस्कार भारती पब्लिक स्कूल या शाळेने आरटीई अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारल्याने पालक संतप्त झाले आहे 31 तारीख शेवटची असल्याने गटशिक्षण अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले.
Parents angry over school denying admission to students under Rte Act
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात आरटीई अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांचा आरटीई अंतर्गत येणाऱ्या इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने वरोरा शहरातील दहा विद्यार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली . यामध्ये शहरातील आरटीई अंतर्गत येणाऱ्या तीन शाळाचा निवड विद्यार्थ्यांनी केला होता. त्यामध्ये संस्कार भारती ही शाळा पोर्टल मध्ये असल्याने विद्यार्थ्यांनी ती निवडली होती. यानंतर विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची चाळणी करून प्रवेश प्रक्रिया देण्याचे ठरले होते. मात्र गेल्या आठवड्याभरापासून पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळेमध्ये रोज जात आहे. शाळेमध्ये वेगवेगळे कारणे सांगून टोलवाटोलवीचे उत्तरे शाळेने दिल्याने शेवटी पालक वैतागले. यानंतर सर्व पालक वर्गाने शिक्षण अधिकारीच्या दालनात तक्रार देत आपला विरोध दर्शविला. शाळा समितीने आपले निवेदन सुद्धा गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी एकच दिवस उरला असून 31 जुलै ही शेवटची तारीख असल्याने मुलांच्या प्रवेशाविषयी पालक चिंतित झाले आहे.
संस्कार भारती शाळेला विचारणा केली असता ही शाळा धार्मिक अल्पसंख्यांक अंतर्गत येत असल्याने आर टी ई विद्यार्थीना प्रवेश नाकारला असल्याचे मत शाळेने कळवले. ही अल्पसंख्यांक शाळा असली तरी अल्संपसंख्यांक विद्यार्थी मात्र या शाळेत किती आहे याचाही प्रश्न पडला आहे. आणि जर नसेल तर मात्र शिक्षण अधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

त्यामुळे पहिलेच उशीर झालेल्या प्रवेशाबद्दल शिक्षण अधिकारी काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment