Ads

सराईत गुन्हेगाराकडुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त ;स्थानिक गुन्हे शाखाची कारवाईOne pistol and one live cartridge seized from the criminal by the local crime branch

चंद्रपुर :- Crime News  पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैदयरित्या अग्नीशस्त्र बाळगाणा-यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले.
One pistol and one live cartridge seized from the criminal by the local crime branch
त्याअनुषगाने पो. नि. महेश कोंडावार, स्थागुशा, चंद्रपुर पथके नेमुण त्यांना अवैध शस्त्र बाळगाणा-याची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली. सदर मोहीमे दरम्यान पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, मौजा पाटाळा ता. भद्रावती जि. चंद्रपुर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलीया खाली एक इसम आपल्या सोबत पिस्टल बाळगुन कथ्या रंगाच्या होंडा सिटी चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ०२ ए. एल. ८०५२ मध्ये बसुन आहे. सदर माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर इसमास ताब्यात घेवुन सदर इसमाच्या ताब्यात असलेल्या पाढ-या रंगाच्या थैलीची तपासणी केली असता, त्यामध्ये एक गावठी बनावटी पिस्टल व त्यात वापरण्यात येणारे एक नग जिवंत काडतुस मिळुन आले. सदर इसमास त्याचे नाव विचारून त्याचे काईम रेकॉर्ड चेक केले असता त्याचेवर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. सदर इसमा विरूदध पोलीस स्टेशन माजरी येथे कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदया अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी नामे मो. जमील अयनुल हक शेख, वय-२२ वर्ष, रा. राजुर कॉलनी, वणी जि. यवतमाळ यास अटक करण्यात आले.त्याच्या कडून १) एक गावठी बनावटी पिस्टल किमंत २५,०००/- रू
२) एक नग जिवंत काडतुस किमंत ५००/- रू.३) जुनी वापरती होंडा सिटी चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ०२ ए. एल. ८०५२ किमंत
२,००,०००/- रू असा एकुण २,२५,५००/- रूपयाचा माल आरोपी कडुन जप्त केला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा/स्वामीदास चालेकर, पोहवा/गजानन नागरे, पोहवा/अजय बागेसर, पोहवा/सतिश अवथरे, पोशि/प्रशांत नागोसे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment