Ads

महसूल कर्मचाऱ्यांचे आजपासून तहसील कार्यालयात बेमुदत काम बंद आंदोलन.Indefinite strike of revenue employees in tehsil office from today.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
 भद्रावती.लाक्षणिक संप करूनही राज्य शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे लक्ष न दिल्याने अखेर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या भद्रावती शाखेतर्फे येथील तहसील कार्यालयात दिनांक 15 रोज सोमवारला सकाळी साडेदहा वाजता पासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. 
Indefinite strike of revenue employees in tehsil office from today
या संपामुळे भद्रावती तहसील कार्यालयातील कामकाज प्रभावत झालेले आहे. या आंदोलनात भद्रावती तालुक्यातील नायब तहसीलदारांसह 21 महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत शासन महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेतर्फे करण्यात आला आहे. महाराष्ट्र महसूल अहर्ता  परीक्षा नियमातील तरतुदीनुसार सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात यावी, महसूल विभागातीलच नियुक्त लेखाधिकारी यांना वेतन पडताळणीची अधिकार प्रदान करण्यात यावे, अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर पदस्थापना देण्यात यावी, अशा विविध मागण्या महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे शासनापुढे ठेवण्यात आल्या  आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या या मागण्या शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासन या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेकडून केला आहे. संघटने कडून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करण्यात आला, मात्र शासनाकडून याकडे दुर्लक्ष  करण्यात आल्याने प्रथम लाक्षणिक संप व आता बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment