Ads

साहेब जि आर आय एल कंपनीने नाले पोखरले उत्खनन झाले ? खराब झालेले रस्ते कोन दुरुस्त करणार The GRIL Company has excavated Drains? But Who Will Repaire Damaged roads?

 [कोरपना प्रतिनिधि ] :-चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगाना महाराष्ट्राला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग बामणी राजुरा ते कोरपणा गोविंदपुर National Highway connecting Telangana to Maharashtra from Bamni Rajura to Korpana Govindpur पर्यंत गेल्या दीड वर्षापासून जोमाने जीआरआयएल कंपनीGRIL COMPANY मार्फत सुरू आहे राज्य शासनाने उत्खननाच्या अटी शर्ती व पायाभूत सुविधा होऊन जलसिंचन साठे वाढविण्यात मदत होईल म्हणून शासन निर्णय घेऊन राष्ट्रीय महामार्गासाठी नाले खोलीकरण मुरूम दगड रेती उत्खननाची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी एक ते 22 अटी शर्ती टाकून जी आर आय एल या कंपनीला देण्यात आले होते मात्र कंपनीने जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन न करता 24 तास रात्रंदिवस तलाव नाले पोखरून काढण्यात आले पोकलेन जेसीबी व हायवे ट्रकच्या माध्यमातून वाहतूक करण्यात आली यामध्ये परिवहन विभागाच्या नियमाचे कोणतेही पालन करण्यात आलेले नाही तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अटी शर्ती भंग करून नाल्यांमधून दगड मुरूम च्या नावावर रीतीचा उपसा करण्यात आला याकरिता पंचनामा करणारी महसुलाची यंत्रणा जलसंधारण अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली तयार करण्यात आली होती मात्र ही समिती कोणत्याही नाल्यावर जाऊन नियमाप्रमाणे पंचनामा घटनास्थळ उत्खननाचे निकष याबाबत दुर्लक्ष करून बसल्या ठिकाणी पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आले यामुळे कंपनीने नाले उत्खननाऐवजी सांधव्याचे उत्खनन केले व याबाबतची पाटबंधारे विभागाने दखल घेऊन कारवाई चा बडगा उगारला त्यामुळेकंत्राटदार कंपनीने पकडी गड्डम कालव्याच्या पूर नियंत्रक भिंतीच काम भर पावसात करीत आहे 
The GRIL Company has excavated Drains?  But Who Will Repaire Damaged roads? 
मात्र या भागातील खडकी रूपापेठ मार्ग कुसळ धानोली कमलापूर मार्ग सोनापूर मुठरा हरदोना पांढरपौणी चनाखा या भागातील सार्वजनिक बांधकाम विभाग व मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्त्याचे तीन 13 झाले असून ठीक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहे यामुळे मोटर सायकल चालवताना सर्कस करावी लागते तर चार चाकी वाहन आदळत आफ्टर रस्त्याने प्रवास करावा लागतो देवघटनाला धानोली हेटी हातलोणी कमलापूर बोरगाव या भागातील वनक्षेत्रापर्यंत संपूर्ण नाले नियमबाह्य खोलीकरण केल्यामुळे पाण्याचे स्त्रोत नष्ट झाले आहे त्यामुळे धो धो पडणारा पाऊस नाल्याच्या प्रवाहामध्ये वाहून जात आहे कंपनीने मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन राजुराकोरपणा या भागात केला असून कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडालेला आहे याला महसूल विभाग पोलीस विभाग व खणी कर्म विभाग डोळे झाक करीत असल्याने कारवाई करणार कोण असा स्वाल नागरिक उपस्थित करत आहे याबाबत अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असून अतिरिक्त उत्खननाचा गौण खनिज शासन खात्यात कंपनीने जमा केला नाही ही माहिती माहिती अधिकारात उघड झाली असून गोविंदपुरचे बामणी पर्यंत करोडो ब्रासखनिजाचा वापर या कंपनीने केलेले आहे कंपनीच्या प्रत्यक्षात झालेल्या कामकाज व मोजमाप पुस्तिकेची पाहणी केल्यास मंजुरी पेक्षा चारपट अधिक उत्खनन केल्याचा उलगडा होईल मात्र कंपनी ही केंद्र शासनाचा रोड आहे असे म्हणत नागरिकांना भूल ताफा देत आम्ही तुमचा रस्ता करून देऊ आम्ही पाण्याची व्यवस्था करून देऊ असे म्हणत संपूर्ण उन्हाळाभर या भागातील नाले खोलीकरण करण्याचं काम कंपनीने केलं याच कंपनीने बोरगाव येथील तीन बंधारे कृषी विभागाचे फोडून त्या ठिकाणावरून रस्ता तयार केला व तेथून उत्खनन केलेले रेती दगड मुरूम वाहतूक केली असे असताना मात्र दुरुस्तीचे सौजन्य या कंपनीने धावलेले नाही अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी बंदराची दुरुस्त करून द्यावी खराब झालेले रस्ते दुरुस्त करावी अशी मागणी देखील राजमार्ग प्राधिकरण व कंपनी व्यवस्थापन कडे केली मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष केल्या जात असून कंपनीने कोटयावधी रुपयाचा गौण खनिजकर बुळविला आहे मात्र असे असताना प्रशासनाकडून दखल घेतल्या जात नसल्याने या भागातील सार्वजनिक बांधकाम विभाग व मुख्यमंत्री सडक योजनेचा तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या रस्त्याची दैना अवस्था या कंपनीकडून करण्यात आलेली आहे प्रशासनाकडून तक्रारीची दखल घेतल्या जात नाही व प्रशासन चौकशी करण्यासाठी पुढे धस्तावत नसल्यामुळेप्रशासनाच्या भूमिकेवर शंका निर्माण झाली आहे कुंपणच शेत खात असेल तर सांगायचं कुणाला रस्त्याची दैना अवस्था असताना सुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन डोळेझाक करून अवैद्य उत्खननाला मुख सम्मती तर देत नाही नाअसा सवाल नागरिक करू लागले आहे या भागातील अनेक गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी साहेब आपण उत्खननाची परवानगी दिली पण हे रस्ते बनवणार कोण असा स्वाद निर्माण केला आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment