Ads

अखेर आठ दिवसांपूर्वी नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आढळला. Finally, the body of the youth who was washed away in the canal eight days ago was found.

भद्रावती जावेद शेख :-आठ दिवसांपूर्वी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह अखेर दिनांक २८ रोज रविवारला सायंकाळी पाच वाजता खुटवंडा येथील नाल्याच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अमित पेंदाम, वय 24 वर्षे, राहणार खुटवंडा असे या मृतक युवकाचे नाव आहे. 
Finally, the body of the youth who was washed away in the canal eight days ago was found.
घटनेच्या दिवशी मुसळधार पावसामुळे सदर नाल्याला पूर आला होता. नाल्याजवळ उभ्या असलेल्या या युवकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व वाहून गेला. त्याला शोधण्याची मोहीम चार-पाच दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येत होती. मात्र पुरामुळे त्याचा शोध लागला नव्हता. अखेर पूर ओसरल्यानंतर त्याचा मृतदेह नाल्याच्या पात्रात आढळून आला. या शोधमोहिमेत आपत्ती व्यवस्थापनाकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचा खेद पोलीस प्रशासनाने व्यक्त केला. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुडे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment