Ads

"वृक्ष संवर्धन कार्य पुढील पिढ्यांची मिळकत"- सौ. पल्लवी ठाकरे "Tree conservation work for future generations' income"- Mrs. Pallavi Thackeray

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
 स्थानिक गौराळा येथील कर्मयोगी संत गाडगेबाबा प्रतिष्ठान  परिसरात वृक्षारोपण तसेच मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
"Tree conservation work for future generations' income"- Mrs.  Pallavi Thackeray
         "वृक्ष लागवड करून वृक्षांची निगा राखणे ही काळाची गरज आहे. सर्व सजीवांना अन्न,हवा आणि पाणी मुबलक प्रमाणात मिळवून देण्यामध्ये संपूर्ण वृक्षवेलींची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.वृक्षांचा वापर केवळ फुले आणि फळे एवढ्या पुरताच मर्यादित नसून,कोरोना काळात ज्या ऑक्सिजनची अतिशय गरज भासली ती उगमस्रोत झाडे पुढील पिढ्यांचा अत्यावश्यक आधार  आहे.वृक्ष संवर्धन कार्य पुढील पिढ्यांची मिळकतअसून आपण सारेजण या अमोल कार्याचे साक्षीदार आहोत." असे विचार सामाजिक कार्यकर्त्या,सौ. पल्लवी  ठाकरे यांनी व्यक्त करून उपस्थितांना झाडांचे महत्व पटवून दिले. यानंतर लगेचच वृक्षारोपण कार्य संपन्न करण्यात आले. फेरीलँड शाळेतील यु. के. जी. वर्गाची विद्यार्थिनी कु. माही प्रकाश ठाकरे हिच्या शुभ हस्ते 'एक पेड माँ के नाम' या संकल्पनेवर  आधारीत वृक्षारोपण कार्याचा श्रीगणेशा करण्यात आला. गौराळा येथील कर्मयोगी संत गाडगेबाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर शिरसागर,  वासुदेव बावणे,रेवती नक्षीने, वंदना मुलकुलवार, लीलाबाई नक्षीने, नीलिमा हिरादेवे, संदीप चटपकर, बंडू भोस्कर ,विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील प्रा. अमोल ठाकरे यांच्यासह गवराळा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक बंधू-भगिनी तसेच बाल गोपाल यांच्या सहकार्याने  वृक्षारोपणाचे कार्य उत्कृष्टरित्या पार पडले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment