जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-भद्रावती शहरालगत असलेल्या लोणारा गावात स्मशानभूमीच नसल्यामुळे येथील गावकऱ्यांना नाही लाजाने हायवेच्या कडेला प्रेतावरील अंत्यविधी पार पाडावा लागतो. येथील स्मशानभूमी करिता 2014 ला जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र ग्रामपंचायतीतर्फे येथे स्मशानभूमीचे काम अद्याप पर्यंत करण्यात आले नाही. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता भद्रावती आम आदमी पक्षातर्फे दिनांक 22 रोज सोमवारला सुरज शहा आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष यांचे नेतृत्वात शहरातील गांधी चौकातून पंचायत समिती कार्यालयावर पुतळ्याची प्रतीकात्मक शवयात्रा काढण्यात आली व गटविकास अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
A symbolic funeral procession to our Panchayat Samiti office for the cremation ground.
स्मशानभूमी बांधकामा संदर्भात लोणारा ग्रामपंचायतीकडून आपल्या कार्यालयाला आजपर्यंत कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याचे यावेळी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. या संदर्भात कार्यालयाला प्रस्ताव प्राप्त झाल्यास यासंदर्भात असलेली लोणारा गावकऱ्यांची समस्या निकालात काढण्यात येईल असे आश्वासनही यावेळी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी सदर आंदोलनकर्यांना दिले. सदर आंदोलनात भद्रावती आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 comments:
Post a Comment