घाटंजी तालुका प्रतिनिधी :-वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालया अंतर्गत येत असलेल्या उंदरणी बिट मध्ये सागवान तस्करी करणारे टोळी सक्रिय झाल्याची टीप घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांना मिळाली.यावरून त्यांनी दिनांक २२ जुलै सोमवारच्या सायंकाळी आपल्या कर्मचाऱ्यांना तैनात करून लक्ष देण्यास सांगितले.अश्यातच एक संशयास्पद वाहन या मार्गाने गेल्याचे निदर्शनास आल्याने सापळा रचून मंगळवारच्या मध्यरात्री २:३० वाजता घटना स्थळी दाखल होवून मोठ्या शिताफीने सागवान लाकडे पकडुन तस्कराचा पर्दाफाश केला. मात्र यातील तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले.
घाटंजी वनपरिक्षेत्र क्षेत्रात काही दिवसापूर्वी मालकी हक्काने सागवान लाकडे कटाई केलेल्या गंजीतून सागवान चोरी झाल्याची घटना घडली होती.याबाबत सागवान मालकाने याबाबत तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत.मात्र त्यांचा शोध लागला नसल्याने चोरट्यांची हिम्मत वाढीस गेली असावी असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.अश्यातच हे चोरटे वनविभागाच्या हद्दीत प्रवेश करून सागवान लाकडे कटाई करू शकतात असा संशय वनपरिक्षेत्र अधिकारी यांना बळावल्याने त्यांनी गस्त वाढवली.अश्यातच सोमवारला मिळालेल्या टीपवरुन देखरेखी साठी वनकर्मचारी तैनात केले.यात एक संशयास्पद वाहन गेल्याचे वनकर्मचाऱ्यांना आढळून आले.ही बाब त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना कळविली यावरून गस्त घालण्याच्या निमित्ताने आपल्या कर्मचाऱ्यांना बोलावून घटनास्थळा कडे रवाना झाले.यात १० ते १५ तस्कर सागवान लाकडे कटाई करून नेत असल्याचे आढळले.अल्प कर्मचारी व जास्त प्रमाणात तस्कर असल्याने मोठ्या शिताफीने घटना स्थळावर पोहचले तोच तस्कर घटना स्थळावरून पलायन करण्यास यशस्वी झाले.यात घटना स्थळावर एम.एच.२९ ए.बी.१५५७ क्रमांकाचे मेटाडोर मोठया गोलाईचे एकूण दहा नग १:३८ मीटर सागवान लाकडे मिळून आले.सागवान लाकडासह वाहन जप्त करण्यात आले असून सदर वाहन चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याचे समजते यावरून सागवान तस्कराचा शोध घेतल्या जात आहे.ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव, वनपाल लाडके,वनरक्षक दरवे,वानखेडे, आत्राम यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment