Ads

सरकार ची 1 रूपयात पिक विमा योजना फसवी

चंद्रपुर:-सरकार द्वारे अधिकृत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी द्वारे शेतक_यांनी 1 रूपयात पिक विमा काढला. परंतु पिकांचे नुकसान झाल्यास त्या क्षेत्राचा पंचनामा करने हे ओरिएंटल इन्शुरंस कंपनी अथवा कृषी विभाग चे काम असताना हे काम तीसरीच झेनित सोल्युशन प्रा. लि. हे पंचनामा करीत आहे. त्यामुळे पंचनामा करण्यामध्ये सावळागोंधळ होत असुन काही शेतक_यांच्या विमा लाभ मिळाला तर काही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित आहे. त्यामुळे सरकारी 1 रूपयात पिक विमा ही योजना फसवी असल्याचा आरोप भूमिपुत्र ब्रिगेड चे सदस्य विजय मुसळे यांनी गुरूवारी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरीषदेत केला आहे.
Govt's Rs 1 crop insurance scheme is fraudulent
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत कित्येक शेतक_यांनी स्वत:च्या शेतमालाचा 1 रूपयामध्ये पिक विमा काढला. हा पिक विमा सरकार द्वारे अधिकृत ओरिएंटल इन्शुरंन्स कंपनीद्वारे काढण्यात येत आहे. पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानी नोंद आनलाईन पध्दतीने दिलेल्या वेळेच्या आत केली होती. यानंतर पीक विमा राशी मिळण्यास सुरूवात झाली असता मूल तहसील चे हळदा गावातील काही शेतक_यांना याचा लाभ मिळाला तर काही शेतकरी पात्र असुनही त्यांना लाभ मिळाला नसल्याने याची तक्रार भूमिपुत्र ब्रिगेड चे डा. राकेश गावतुरे यांचे कडे केली असता यासंदर्भात कृषी विभाग उपसंचालक चंद्रपुर यांचेकडे विचारणा केली. त्यांनी ओरिएंटल कंपनी कडे विचारणा करण्याची माहीती दिली. वास्तविक पंचनामा करण्याचे काम ओरिएंटल कंपनी चे कर्मचारी अथवा कृषी विभाग कर्मचारी यांना असताना हे काम तिसरीच कंपनी झेनित सोल्युशन प्रा. लि. ला दिले. संबंधित तीसरी कंपनीला विचारण केली असता वेळेच्या आत नुकसानीच्या पिकांची नोंद न केल्यामुळे पिक विमासाठी अपात्र असल्याची माहीती दिली. परंतु शेतक_यांनी उपसंचालक कृषी विभाग यांचे समक्ष वेळेत नोंदणी केल्याचे पुरावे सादर केले. झेनित कंपनी कार्यालयात गेले असता त्याला कुलूप लागलेले असते. त्यामुळे कोणत्या अटीवर शेतक_यांना पात्र अपात्र ठरविण्यात येत आहे याबद्दल कळायला मार्ग नाही तसेच याला जिम्मेदार कोण?असा प्रश्न आता शेतक_यांसमोर उभा आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 1 रूपयामध्ये पिक विमा योजना फसवी असल्याचा आरोप भूमिपुत्र ब्रिगेड सदस्य विजय मुसळे यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतक_यांच्या खात्यात पिक विमा राशी लवकरात लवकर जमा न झाल्यास भूमिपुत्र शेतकरी ब्रिगेड च्या माध्यमानून तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पत्रपरीषदेत भूमिपुत्र शेतकरी ब्रिगेड चे विजय मुसळे, दिपक वाढई, प्रकाश चालुरकर, विक्रम गुरनूले, रितेश मैकलवार आदि उपस्थित होते.
------------------------------
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment