Ads

पोलिस प्रशासनाच्‍या नाकावर टिच्‍चून वाळू तस्‍करी?

सादिक थैम :-वरोरा तालुक्यातील वर्धा नदिकाठच्या करंजी, तुळाणा, मार्डा, सोईट गावांमध्ये वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. वरोरा येथून वाळूची भरधाव वेगाने जाणारी वाहने पाहून नागरिकांना अनेक प्रश्‍न पडले आहेत.
Trafficking sand on the nose of the police administration?
मार्केट मधून धुळ उडवत बेभानपणे वाळूची जाणारी वाहने नेमका काय संदेश देत आहेत. याचीच चर्चा नागरिकांमधुन सुरू आहे.वर्धा नदीपात्रातून वाळूची सर्रासपणे होत असलेली वाळू तस्‍करी अनेक प्रश्‍नचिन्‍ह निर्माण करत आहे. मोठमोठी वाळूची वाहने वरोरा मधून रात्री मार्केट मधून भरधाव वेगाने जात असतांना त्‍यांना कोणाचाही धाक राहीला नसल्‍याचे दिसून येत आहे.प्रशासनाला जणू खिशात ठेवल्‍याच्‍या अविर्भावात वाळू माफीयांचा हैदोस सुरू आहे. पोलीसांसह महसूल प्रशासनाच्‍या समोरून भरधाव वेगाने जात असतांना मात्र अधिकारी कर्मचारी फक्‍त बघ्‍याची भुमिका घेत असल्‍याने नेमकं चाललंय काय असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.वर्धा नदीपात्रातून सुरू असलेली वाळूची अवैध वाहतुक ही काही दहा पाच हजाराची नाही, तर लाखो रूपयांची आहे. मात्र महसूल प्रशासन किंवा पोलीस प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत असल्‍याचे चित्र पहायला मिळत आहे.

हप्‍ते कोणा कोणाला जातात?

वाळू माफियांकडुन हप्ते वसुली करणारा तो कॉन्स्टेबल कोण? वाळू माफीयांचे कोणाकोणला हप्‍ते जातात? त्‍यांनी कोणाचे खिसे गरम केले आहेत? कार्यवाही आधीच वाळू माफीयांना कोण टीप देतो! जागोजागी नेमलेले लोकेशन देणारे एजंट कोण आहेत? महसूल आणि पोलीस प्रशासनाच्‍या गाड्या बाहेर पडल्‍या की त्‍यांचा पाठलाग करणारे एजंट कोण आहेत? याचा तपास वरिष्‍ठांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण पाणी कुठं तरी मुरतंय हे ही तितकेच खरे.

एक दोन कर्मचारी पाठवून वाळूमाफीयांना रोखता येईल का?

महसूल किंवा पोलीस प्रशासनातील एक दोन कर्मचारी पाठवून वाळूमाफीयांना रोखता येईल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शक्‍यतो पोलीस आणि महसूल प्रशासन एकत्र कार्यवाही करतांना दिसत नाही किंवा दोघांमध्‍ये समन्‍वय नाही.एकाचवेळी अनेक कर्मचारी जर कार्यवाही करण्‍यास गेल्‍यास नक्‍कीच वाळू माफीयांना चाप बसू शकतो, त्‍यांच्‍यावर कार्यवाही होवू शकते, परंतू तेरी भी चुप मेरी भी चुप अशी सध्‍याची अवस्‍था असल्‍यामुळे कोणीच पुढे येतांना दिसत नाही. थातूर मातूरपणे एखादी कार्यवाही करून स्‍वत:ची पाठ थोपटली जाते.

वाळूमाफीयांची वर पर्यंत लिंक ?

ज्‍या अविर्वाभावात वाळू माफीया वाळू तस्‍करी करीत आहेत आणि ज्‍या प्रकारे त्‍यांना कोणीही रोखणारे दिसत नाही त्‍यानुसार त्‍यांची वरपर्यंत लिंक असल्‍याची चर्चा ऐकायला मिळत आहे, खरंच जर वर पर्यंत लिंक असेल तर वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी याचा तपास करणे गरजेचे आहे, कारण हा तपास नाही केला तर संशयाच्‍या भोवऱ्यात ते पण येतात हे वरिष्‍ठांनी लक्षात घ्‍यावे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment