Ads

सिने स्टाईल पाठलाग करून पकडले रेती भरलेले ट्रॅक्टर

सादिक थैम वरोरा :-अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर शेगाव मंडळ अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आष्टा बायपास, शेगाव बु येथील रस्त्यावर ट्रॅक्टर पकडले असून महसूल अधिकाऱ्यांनी भद्रावती तालुक्यातील वायगाव तुकुम येतील मारुती गायकवाड यांच्यावर कारवाई केली आहे..
A sand-laden tractor caught in a cine-style chase
रेती तस्कर रात्रीचा फायदा घेत गौण खनिज अवैध उत्खनन करून मालामाल होण्याची स्पर्धा शेगाव तसेच ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेली आहे, रेतिची तस्करी असल्याची माहिती मंडळ कार्यालय शेगाव यांना मिळतात त्यांनी आष्टा शेगाव रस्त्यावर सापळा रचून पथकाव्दारे ट्रॅक्टर थांबवले मात्र ट्रॅक्टर चालक यांनी थांबवलेले ट्रॅक्टर अधिकारी दूर जाताच पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता मण्डल अधिकारी यांनी सिने स्टाईल ने पाठलाग करून गावामधे पकडून अवैध रेती वाहन तहसील कार्यालय वरोरा या ठिकाणी जमा करण्यात आली आहे. ही कारवाई वरोरा तहसील कार्यालयाचे तहसिलदार योगेश कौटकर यांच्या नेतृत्वात शेगाव मंडळातील तलाठी स्नेहा रोहनकर, मंदा हेपट, विभा सोयाम, रोहित घायवनकर, घनश्याम घुगल, गौरीशंकर वालोदे, यांनी केले आहे. अवैध रेती तस्करी करत असताना कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट ट्रॅक्टर व ट्रॉली वर आढळून येत नाही. मात्र याकडे पोलीस विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांची हिम्मत फार मोठ्या प्रमाणत वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याचे मागणी जनतेकडून करण्यात येत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment