Ads

असंख्य युवकांचा आम आदमी पार्टी मध्ये पक्ष प्रवेश.

चंद्रपूर : आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजूभाऊ कुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यात आप जिल्हा आणि महानगर तर्फे भव्य पक्षप्रवेश तथा नियुक्ती प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मोठ्या हल्लोषामध्ये चंद्रपूर येथील बी जी सेलिब्रेशन हॉल येथे पार पडला. यावेळेस असंख्य कार्यकर्त्यांनी राजू कुडे यांचा नेतृत्वात पक्ष प्रवेश केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश संघटन सचिव भूषणजी जी ढाकुलकर यांनी उपस्थित मान्यवरांना पक्षाचे ध्येय धोरण आणि आम आदमी पार्टीची खरे पाहता गरज काय हे पटवून दिले.
Many youths joined the Aam Aadmi Party
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राजू कुडे यांनी नवनियुक्त झालेल्या युवा पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागायचे व सत्ताधारी बीजेपी आणि विरोधक काँग्रेस याना यावेळी घरी बसवन्याचे काम करायचे आहे सांगितले आहे , केजरीवाल यांचे काम घर टॅक्स हाफ, नळ बिल माफ, मोफत शिक्षा, स्वास्थ इत्यादी कामे जनते पर्यंत पोहचवने अशी विनंती त्यांनी केली सदर कार्यक्रम वेळी संचालन जावेद सय्यद अल्पसंख्यांक महानगर अध्यक्ष यांनी केले.तर कार्यक्रमाला यशस्वी करणायाकरिता अनुप तेलतुबडे, मनीष राऊत, आदित्य नंदनवार, जयदेव देवगडे, फहीम शेख, शशिकांत मेश्राम, सागर बोबडे यांनी योगदान दिले.

यावेळेस सुनील मुसळे वरिष्ठ नेता, जिल्हा अध्यक्ष मयुर राईकवार, जिल्हा संघटन मंत्री योगेश मुरहेकर, जिल्हा संघटन मंत्री शंकर सरदार, जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख, जिल्हा सचिव राज नगराळे, जिल्हा विधि सल्लागार एड. किशोर पुसलवार, जिल्हा सदस्य परमजीत सिंह झगड़े, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर अध्यक्ष तबस्सुम शेख, संघटन मंत्री संतोष बोपचे, बल्लारपुर शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार, सोनल पाटिल, सुनील सदभैया, सुजाता देठे, सुमित हस्तक, जितेंद्र भाटिया, हर्षल नेवलकर, रणजीत बोरकुटे, राजू तोंडासे, वीरू खोब्रागडे, सुरेंद्र जीवने, सचिन मत्ते, विशाल माने अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment