Ads

सिडबोल तयार करून जागतिक पर्यावरण दिन साजरा.Celebrate World Environment Day by creating Sidbol.

राजुरा 5 जून:-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातील राजुरा तालुक्यातील प्रथम क्रमांकप्राप्त आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर व  आदर्श हायस्कुल राजुरा येथे राष्ट्रीय हरित सेना विभाग व स्काऊट गाईड , सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यामानाने जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने सिडबोल निर्मिती उपक्रम राबविण्यात आला.
Celebrate World Environment Day by creating Sidbol.
 यावेळी शोभा उप्पलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण राजुरा, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो तथा  राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख व स्काऊट लीडर, आदर्श शाळेचे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, सामाजिक वनीकरण चे सुनील मेश्राम, वनपाल, शीतल ताकसांडे, वनरक्षक, बबलू चव्हाण, युवा राज्याध्यक्ष, नेफडो, अविनाश दोरखंडे,अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ, वर्षा कोयचाळे, ऍड.मेघा धोटे, जयश्री धोटे, सचिन मोरे,वामन पुरटकर,किशोर कडुकर, सचिन पहानपटे, विद्यार्थी प्रांजू सातपुते, अनुष्का वांढरे,जयेंद्र बुरडकर, गौरव बोबडे, अनमोल आमनर,सुवर्णा बेले, दूर्वा बेले, ओवि बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
यावेळी शिसम, भोकर, सीताफळ, अर्जन, खारीक, कडुनिंब, बदाम, बिबा, चिंच, चिकू, आंबा आदींच्या वृक्षांच्या बियाणे वापरून शेणखत, गांडूळ खत, काळी माती यांचे मिश्रण करून सिडबोल तयार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सिडबोल ची अक्षर साखळी तयार करून  पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याची बचत करा, झाडे लावा ,झाडे जगवा, वाघ वाचवा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा , प्लास्टिक वापर टाळा, कापडी व कागदी पिशवीचा वापर करा असे संदेश देऊन जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सामाजिक वनीकरण, आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब), छ.शिवाजी महाराज स्काऊट युनिट, छ.संभाजी महाराज स्काऊट युनिट, राष्ट्रमाता जिजाऊ गाईड युनिटच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन बीज संकलन करून सिडबोल निर्मिती करिता सहकार्य केले.

बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिडबोल निर्मिती उपक्रम मोठ्याप्रमाणात राबविण्यात आला. या सिडबोल चे पावसाळा लागताच रोपण करण्यात येईल. पर्यावरणाचे आपल्याभोवती असणे आणि त्यांचा वापर करीत विविध घटकांची हानी होत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागल्याने याबाबत जनजागृती करण्याची गरज उत्पन्न झाली आहे.

शोभा उप्पलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा
पर्यावरणविषयक कार्यक्रम, उपक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक , सामाजिक संघटना, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्टे ठेवून शाश्वत विकासावर भर दिला पाहिजेत. सर्वांनी पर्यावरण संवर्धन करिता सहभागी झाले पाहिजेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment