Ads

घुग्घुस येथे विज वितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात संतप्त महिलांची धडक  

घुग्घुस :येथील विज वितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात सोमवार, १७ जुन रोजी नकोडा येथील संतप्त महिलांनी धडक दिली.

Angry women strike against poor management of electricity distribution office in Ghughus
नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर यांच्यावर घुग्घुस येथील विज वितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार लपविण्यासाठी खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नकोडा येथे नवनियुक्त असलेले वायरमन सुरज परचाके हे आपले काम जबाबदारीने करीत नसल्याने नकोडा वासियांची मोठी गैरसोय होत आहे. हा वायरमन मुख्यालयी राहत नाही विज खंडित झाल्यानंतर नकोडा वासियांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता तो वेळेवर येत नाही आणि एका खाजगी काम करणाऱ्या व्यक्तीला पाठवतो आणि काम करायला सांगतो.

दिवसरात्र वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने नकोडा वासियांना रात्रभर अंधारात जागे राहावे लागते. खंडित झालेला विज पुरवठा वेळेवर सुरु न झाल्याने नकोडा गावातील पाणी पुरवठा बंद होतो.

१४ जुन रोजी रात्रीला १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत विज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नकोडा गावातील नागरिक त्रस्त झाले. १५ जुन रोजी सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान गावात वायरमन सुरज परचाके दिसला असता विज पुरवठा खंडित असल्यामुळे त्रस्त झालेल्या संतप्त गावकऱ्यांनी त्याला पकडले व त्याला दुपट्याने बांधण्यात आले व जाब विचारला व नागरिकांनी सरपंच किरण बांदूरकर यांना बोलाविले असता त्यांनी समजूत काढून त्याला सोडविले परंतु नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर यांच्याविरोधात खोटे आरोप करीत पोलीस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्यात आला

त्यामुळे नकोडा येथील संतप्त महिलांनी विज वितरण कार्यालयात धडक देत तक्रार परत घेणे आणि वायरमन सुरज परचाके यांची तत्काळ बदली करण्याची मागणी रेटून धरली तसेच मागणीचे निवेदन दिले नंतर पोलीस ठाणे गाठून पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजपाचे ऋषी कोवे, सविता कोवे, उपसरपंच मंगेश राजगडकर, सदस्य कंम्पा राजन्ना, तनुश्री बांदूरकर, सुजाता गिद्दे, महादेव पाझारे, उज्ज्वला ठमके, पुष्पांजली काटकर, भारती ठमके, सुचिता बोबडे, सारिका चोपणे, सरोजा पोल, ममता मोगरे, लक्ष्मी मंथेना, बिंदू काटकर, मंदा वरारकर, सविता शेपूलवार व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment