Ads

रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती महसूल विभागाची कारवाई

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती चारगाव नदी अहेरी घाटातून ट्रॅक्टर मध्ये अवैधपणे रेतीचा भरणा करीत असलेल्या ट्रॅक्टरवर भद्रावती महसूल विभागाव्दारे कारवाई करीत ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई भद्रावती तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाव्दारे दिनांक 2 रोजी रविवार सकाळी करण्यात आली या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
Bhadravati Revenue Department action against sand smuggling tractors
तालुक्यातील चारगाव अहेरी घाट परिसरातील एका नाल्यात हे ट्रॅक्टर अवैधपणे रेतीचा उत्खनन करीत होते. दरम्यान भद्रावती महसूल विभागाचे गौण खनिज पथक यांना गुप्त माहिती मिळाली असता ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर गौण खनिज पथकाने अहेरी घाटातून ट्रॅक्टर अवैद्य रेती भरून येत असता सदर ट्रॅक्टरवर कारवाई करीत ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 टीसी 165 ट्रॉली क्रमांक नसलेल्या ट्रॅक्टरला ताब्यात घेतले व ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले. विजासन येथील बाळू झोडे यांच्या मालकीचे सदर ट्रॅक्टर असल्याचे महसूल विभागाद्वारे सांगण्यात आले. सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी होत असल्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी महसूल विभागाचे गौण खनिज पथक दिवस-रात्र या प्रकारावर लक्ष ठेवून कारवाई करीत आहे.सदर कारवाई तहसीलदार अनिकेत सोनवणे, तलाठी खुशाल मस्के, तलाठीपरेश मैदमवार, गौण कर्मचाऱ्यांनी केली. घटनेची पुढील कारवाई महसूल विभागातर्फे सुरू आहे.
चार रेती तस्करी सदर घाटाला आपले निजी घाट समजून अवैधरित्या रेती उत्खनन करत होते.चार पैकी एक रेती तस्कर महसूल विभागाच्या जाळ्यात सापळला आता उर्वरित तीन तस्करांवर कारवाई कधी होणार या कडे लक्ष लागले आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment