Ads

तालुक्यातील बार आणि बियर शॉप झाले सैराट

सादिक थैम वरोरा:- तालुक्यातील दारू दुकानाच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मद्य विक्रीसाठी दुकानदाराची होड लागली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड दारू विक्री होत आहे. मात्र याच्यावर राज्य उत्पादन शुल्काचा कसलाही निर्बंध दिसून येत नाही.
The bar and beer shop in the taluk became a hit
प्रत्येक खेड्यामध्ये अवैधरित्या दारू विक्री करताना दिसत आहे. तालुक्यातील काही बार सकाळी आठ वाजेपासून सुरू होतात. आणि रात्री बारा वाजेपर्यंत मागच्या दरवाज्याने उघडेच असतात ‌. बंद च्या (ड्राय डे ला) तारखेला दुकानापुढेच दारू विकली जाते. वरोरा तालुक्यात वाईन शॉप एकच असल्यामुळे संपूर्ण खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू, अवैधरीत्या पोचवली जाते. दरवेळेस राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे या संबंधात विचारणा केली असता कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचा तपशील दिल्या जातो.
त्यामुळे आता कोणाचेच लक्ष मद्य विक्रेत्यांकडे राहिले नाही अशी टीका जनतेकडून होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील अधीक्षकांसह अधिकाऱ्यांवर आरोप झाल्याने या कार्यालयात काय होत असेल यावरून कल्पना करता येईल.

तरीसुद्धा राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला जागा आलेली नाही.

वरोरा तालुक्यात एकाच दुकानात बार आणि बियरचे लायसन सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिकचा दर द्यावा लागतो. सिग्नेचर MRP 365 रू मध्ये मिळणारी निप ,विदेशी दारू चक्क 550रू भावाला विकली जात आहे . बियर 180 रुपयाची 300 रू ला विकली जाते. परमिट रूमच्या बाहेर पर्यंत आलिशान टेबल लावून अवैधरीत्या दारू विकली जाते. सर्विस चार्जच्या नावाखाली 60% पर्यंतची आधीकची रक्कम ग्राहकाकडून वसूल करण्यात येत आहे. आणि दुकानदाराला जीएसटी बिल मागितले तर ग्राहकांसोबत हूज्जत बाजी केली जाते. तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याकडे गेला तरी आमचे काही बिघडवू शकत नाही असे उद्धट उत्तर देण्यात येते.
दुकानदार जीएसटी बिल मागितल्यास देत नाही . काहींजवळ बिलबुकच नाही. मागील वर्षी या संबंधात बऱ्याच बातम्या येऊन गेल्या मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला अजून पर्यंत जाग आलेली नाही. नाममात्र कारवाई दाखवून कारवाई केल्याचा आव आणला जात आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते मात्र मद्य प्राशन करणारे परवान फार कमी जणा जवळ आहेत. पाच रुपयाच्या डेली परवाण्यावर हा सगळा खेळ दुकानदार आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्यासहमतीने केला जातो. आणि याच ठिकाणी अधिकारी आणि दुकानदार यांची काळाबाजारी मोठ्या प्रमाणात होत आहे.
तालुक्यात मागील काही दिवसात तीन लाख रुपये हप्ता मागण्याची घटना चर्चेत आली होती. याचे मुळात कारण या ठिकाणी बुट्टी बोरी व वर्धा मार्गे अवैध दारू येत असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. त्यामुळे प्रति पेटी मागील नफ्यावरून कमिशन मागल्या गेले होते. मात्र संबंधित कार्यालयाने आपल्यावर बाजू येतात हे प्रकरण तिथेच दडपले होते. यानंतर गुप्तपणे राजरोजपणे हा व्यवसाय सुरूच आहे.

त्यामुळे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी लक्ष देऊन हृया अवैध चालणाऱ्या काळ्या धंद्यांवरती तोडगा काढावा अन्यथा अशा बहुतांश बार व दुकानाचे परवाने रद्द करावे अशी मागणी जनते तर्फे करण्यात येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment