Ads

घोरपड वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या आरोपीना केले जेरबंद

राजुरा 20 जून :-वनविभाग वनपरिक्षेत्र राजुरा उपक्षेत्र राजुरा नियतक्षेत्र सुमठाणा येथील गुप्त माहितीद्वारे मौजा भेदोडा गावात धाड टाकून अवैध्यरित्या घोरपड वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपींना पकडून प्राथ. वनगुन्हा क्र.08898/222426/ दिनांक 19/06/2024 वनगुन्हा नोंदवून घोरपड मास जप्त करून आज दि. 20 जून ला राजुरा न्यायलायात आरोपींना हजर करण्यात आले.
The accused who hunted Monitor Lizard Animal were jailed
सदर कार्यवाही पी.ए.जोंग (आय एफ एस) उपविभागीय वनाधिकारी राजुरा, एस.डी. येलकेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आर. पि मत्ते , क्षेत्रसहाय्यक राजुरा, एस. व्ही. गजलवार , नियत वनरक्षक रामपूर, पि. ए.मंदुलवार ,राजुरा, एम. ए. चापले,वनरक्षक ,चुनाळा व एस.आय.तोडासे, सुमठाना व वनमजूर आदींचे सहकार्य लाभले. राजुरा वनविभागाने अवैधरित्या वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर लक्ष ठेवून आरोपींच्या मूसक्या आवळायला सुरुवात केली असून त्यामुळे वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षण करिता पाळत ठेवली जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment