Ads

आंतरराज्यीय ट्रक चोरी करणारी टोळीतील आरोपीस मेहबुबनगर, तेलंगणा राज्यातुन अटक

चंद्रपुर :-दिनांक ०४/०६/२०२४ रोजी फिर्यादी रमेश सुरेश पवार, वय-४१ वर्ष, धंदा-खा. नोकरी, रा. कृष्णानगरी, तिळक वार्ड, वरोरा, जि. चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार दिली की, फिर्यादीचा भाउ सुरेश पवार याचे मालकीची टाटा कंपनीचा हॉयवा टिप्पर क्रमांक एम. एच. ३४ बी झेड ६९६३ किमंत ५७,००,०००/- रूपये ही दिनांक ०३/०६/२०२४ रोजी सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान त्याचे घराचे बाजुला उभी करून ठेवली असता रात्रौ दरम्यान कोणी तरी अज्ञात चोराने हॉयवा टिप्पर चोरून नेले अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, वरोरा येथे अप.क. ४६९/२०२४ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
Accused of inter-state truck theft gang arrested from Mehbubnagar, Telangana state
सदर गुन्हयात चोरीस गेलेल्या हॉयवा टिप्परचा शोध घेणे कामी मा. पोलीस अधिक्षक सा, चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. वरोरा यांचे मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक स्थागुशा, चंद्रपुर व पोलीस निरीक्षक, वरोरा यांचे नेतृत्वात ट्रक चोरी बाबत पोउपनि विनोद भुरले स्थागुशा, चंद्रपुर यांचे अभिपत्याखाली स्थागुशा, चंद्रपुर व पोलीस स्टेशन, वरोरा येथील कर्मचारी नेमुण गुन्हयात चोरीस गेलेला ट्रक तसेच अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यास सांगितले. त्यावरून सदर पथक हे चोरीस गेलेला ट्रक हा वरोरा, पांढरकवडा मार्ग हैद्राबाद कडे गेल्याची गोपनिय माहिती प्राप्त करून अतिशय परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून चोरीस गेलेल्या गाडीचा पाठलाग करीत राज्य तेलंगणा जिल्हा महेबुबनगर येथुन आरोपी नामे उस्मान उर्फ चौचु भिंभडा खान, वय-२३ वर्ष, धंदा-चालक, रा. कंगारका घर क्रमांक ४७, जि. मेवात, राज्य-हरियाणा याचेकडुन पोलीस स्टेशन वरोरा येथुन चोरीस गेलेली टाटा कंपनीचा हॉयवा टिप्पर क्रमांक एम. एच. ३४ बी झेड ६९६३ किमंत ५७,००,०००/- रूपये तसेच पोलीस स्टेशन, हिगंणघाट जि. वर्धा येथुन चोरी केलेले टाटा कंपनीचा हॉयवा टिप्पर क्रमांक एम. एच. ३२ ए. जे.३६९८ किमंत २८,००,०००/- रूपये असा एकुण ८५,००,०००/- रूपयाचे ट्रक जप्त केले.

गुन्हयात अटक आरोपी नामे उस्मान उर्फ चौचु भिंभडा खान, वय-२३ वर्ष, धंदा-चालक, रा. कंगारका घर क्रमांक ४७, जि. मेवात, राज्य-हरियाणा यास अधिक विचारपुस केली असता त्यांनी त्याचे साथीदारसह हरियाणा राज्यातुन महाराष्ट्र व इतर राज्यात जावुन ट्रक सारखे जड वाहनांची चोरी करून तेलगंणा राज्यात नेवुन तेथील साथीदारासह वाहनांचे इंजिन व चेचीस क्रमांक तसेच वाहनांचे समोरील क्रमांक बदलवुन वाहने हरियाणा तसेच गुजरात राज्यात पाठवित होते. सदर आरोपीतांनी यापुर्वी महाराष्ट्र तसेच इतर राज्यातुन ६ ते ८ ट्रक चोरी केल्याचे सांगत आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक श मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, नयोमी साठव मॅडम, उपविभागीय कार्यालय, वरोरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर, पोलीस निरीक्षक, अमोल काचोरे, पोरटे वरोरा याचे नेतृत्वात पोउपनि विनोद जी. भुरले, पोहवा/किशोर वैरागडे, पोहवा/रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा/सतिश अवथरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच पोशि/संदिप मुळे, पोशि/विशाल राजुरकर पोलीस स्टेशन, वरोरा यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment