Ads

गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई २५ लाखाचे चोर बिटी बियाने जप्त


गोंडपिपरी -गोंडपिंपरी येथे गोंडपिपरी पोलिसांनी व कृषी विभागाच्या भरारी पथकाने दि 23 गुरुवारी रात्री बारा वाजता दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एका आरोपीला २५ लाखाचे चोर बिटी बियाणे वाहतूक करताना बियाणे जप्त केले.
Gondpipri police strike action, 25 lakhs worth of thief biti seeds seized
अनाधिकृत चोर बेटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही .कृषी विभागाने अनाधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. मात्र गोंडपिंपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असल्याने व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने चोरबीटी बियाणे वाहतूक होत असते.शेतकऱ्यांना चोर बिटि विक्री करून फसवणूक केली जात आहे.या सगळ्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी कृषी विभाग,पोलीस विभाग हे अलर्ट आहेत.ठाणेदार रमेश हत्तिगोटे व पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना दि.२३ रात्री १२ वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर गोंडपिपरी पोलिसांनी आकाश गणेश राऊत वय (24) रा.अहेरी, जिल्हा गडचिरोली यांचे गाडी क्रमांक MH 34 एम 8635 वाहनाची तहसिल कार्यालय गोंडपीपरी समोर वाहन थांबवून झडती घेतली असता वाहनात अनधिकृत कापूस बियाणे 12.90 क्विंटल 25.80 लक्ष रुपये किमतीचे बियाणे सापडले. संबंधित बीटी वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.दि. (24)शुक्रवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चौकशी व कारवाई प्रक्रिया पार पडली. ही कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का,पोलीस उपपविभागीय अधिकारी शिवलाल भगत,विकास पाटील संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण आयुक्तालय,जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार,मुख्य गुणवंत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख,कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत,उपविभाग कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी,कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पंचायत समिती कृषिअधिकरी महेंद्र डाखरे, मोहीम अधिकारी लंकेश कटरे,श्रावण बोढे,विवेक उमरे,पोहवा देविदास सुरपाम,मनोहर मत्ते,शांताराम पाल, प्रशांत नैताम,पूनेश्वर कुळमेथे यांनी कार्यवाही केली. चोरबीटी बियाणे, युरिया खत व पिकप वाहन असा एकूण 30 लाख 86 हजार 290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment