Ads

जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने गायीचा मृत्यू Cows die after touching live electric wire

जावेद शेख तालुका प्रतिनिधी 
भात्रावती : तालुक्यातील आष्टी (तुकुम )शेत शिवारात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या खांबावरील तारा तुटून खाली पडल्याने जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एका गाईचा मृत्यू झाला. सदर घटना दि.२५ मे रोजी सकाळी ८:३० वाजता गजानन काकडे यांचे शेतात घडली.
Cows die after touching live electric wire
   आष्टी काकडे निवासी गुलाब बबन काकडे यांच्या मालकीची ही गाय असून त्यांनी सकाळी चराई साठी सोडली.आष्टी काकडे येथील गजानन काकडे यांचे शेतातून जात असताना आधीच तुटून पडलेल्या ११ केवी जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला.यात त्यांचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले.या घटनेची तक्रार विद्युत विभागाला करण्यात आली.घटनेचा पंचनामा करून पशुधन विकास अधिकारी डॉ.विकास ताजने व डॉ.नन्नावरे यांनी गायीच्या प्रेताचे शव विच्छेदन केले.झालेल्या नुकसानीची मागणी गुलाब काकडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाकडे केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment