भद्रावती तालुका प्रतिनिधी - नुकतेच जिल्हा परिषद शाळा कोच्ची येथे गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. प्रकाशजी महाकाळकर साहेब यांच्या प्रेरणेने इंग्रजी विषयाची कार्यशाळा नुकतीच पार पडली.
यात कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ प्रीतिताई उमरे, उपाध्यक्षा शा. व्य. समिती या लाभल्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी मा. श्री. डॉ प्रकाशजी महाकाळकर साहेब, केंद्रप्रमुख भारतजी गायकवाड सर, शालिनीताई जगताप, अंगणवाडी सेविका या लाभल्या होत्या.तज्ञ मार्गदर्शक म्हणून गजानन बोढे सर लाभले होते.
Today's teachers are the foundation of skilled India - Group Education Officer Dr. Mahakalkar sir
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख गायकवाड सर नी केले यात त्यांनी केंद्राचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी या कार्यशाळेचा उपयोग होणार आहे, निपुण भारत च्या आलेल्या साहित्याचा योग्य वापर करण्याच्या सूचना पण यावेळी देण्यात आल्या. दोन एप्रिल ला वाचन संस्कृती दिवस साजरा करण्याचा पण मानस त्यांनी व्यक्त केला.
यात त्यांनी Life is a Drama, Earth is a stage, Man is a Actor and God is a Director. आहे हे समजून सांगितलं. यात शिक्षकांनी ATTITUDE ठेवून अध्यापनाचे कार्य करावे असे मत व्यक्त केले.
डॉ महाकाळकर साहेब यांनी आपल्या तालुक्यातील सर्वच शिक्षक एकदम एकजुटीने कार्य करत असून हाच उत्साह मुलांच्या प्रगतीसाठी मदत करत असल्याचे प्रतिपादन केले, याप्रसंगी त्यांनी अभंगातून उपस्थित शिक्षकांना अध्यापनाचे महत्व पटवून सांगितले, आपण केलेले कार्यच आपल्या यशाची प्रचिती देत असते, कोमल कळ्याना फुलवण्याच उत्तम कार्य करा असा संदेश त्यांनी यावेळी देऊन इंग्रजी विषयाबद्दल मुलांच्या मनात आवड निर्माण करण्याचा मानस यावेळी बोलून दाखवला.
याप्रसंगी मागील वर्षी तालुक्यातून एकमेव नवोदय ला लागलेला विद्यार्थी हा ढोरवासा केंद्राचा स्पंदन श्रीमंत मानकर याचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर सर्वधर्मसमभाव प्रार्थना घेऊन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
गजानन बोढे सर यांनी त्यांच्या राबवलेल्या उपक्रमाचे व्हिडिओ द्वारे आणि माहिती देऊन अध्ययन स्तर कसा उंचावता येईल याबद्दल मार्गदर्शन केले, मुलांना छोटे छोटे प्रश्न विचारा, नवीन वाक्य ऐकण्याची संधी उपलब्ध करून घ्या, आपल्या मुलांना आपली गरज आहे, त्यांच्या पाठीशी उभे रहा व त्यांना तुमच्या असण्याची जाणीव करून घ्या असे मार्गदर्शन पर वक्तव्य बोढे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री नळे सर, माधुरी चिंचोळकर मॅडम यांनी खूप मेहनत घेतली, कार्यक्रमाचे सुंदर संचालन वर्ग दुसरीची विद्यार्थिनी आस्था जगताप व कनक भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रिंकल उमरे हिने केले
0 comments:
Post a Comment