भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती,विकास कामाबद्दल विरोधी उमेदवार आम्हाला प्रश्न विचारीत आहे. मात्र पालकमंत्री असताना आकस बाळगून विरोधी उमेदवाराने वरोरा तथा भद्रावती तालुक्याकडे दुर्लक्ष करून येथील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे विकास कामा संबंधात त्यांनाच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीमध्ये लढल्या जात आहे, त्यामुळे हुकूमशाह मोदीचे सरकार उलथवून लावण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणा असे आवाहन चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.
This election is dictatorship vs democracy: Pratibha Dhanorkar.
शहरातील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात महा विकास आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस जिल्हा महासचिव धनंजय गुंडावारष राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख सुधाकर रोहनकर,राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक पुरुष व महिलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व विविध संघटनांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत काळे यांनी तर संचालन सुरज गावंडे यांनी केले. सदर संवाद कार्यक्रमाला शहर तथा तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
0 comments:
Post a Comment