Ads

चंद्रपुर जिल्हयाती सुगंधीत तंबाकु तस्कर जयसुख ठक्कर व महेश गुप्ता वर गुन्हा दाखल....

चंद्रपुर :- पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले त्याअनुषगाने पो. नि. महेश कोडावार, स्थागुशा, चंद्रपुर पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दि.
२९/०४/२०२४ गोपनिय बातमिदाराकडुन पोलीस स्टेशन, मुल ह‌द्दीतील मौजा राजगड फाटा ता. मुल, जि. चंद्रपुर येथुन एक महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३५ के. ४१५९ मध्ये अवेधरित्या दारूचा साठ वाहतुक करून गडचिरोली जिल्हयामध्ये जात आहे अशा खबरे वरून मौजा राजगड फाटा येथे नाकेबंदी करून नमुद वाहनाला थांबवुन त्यामध्ये गाडीचा चालक १) आदिल पठाण, रा. दसरा चौक, सिंदेवाही, जि. चंद्रपुर, व त्याचे सहकारी २) पलाश बांबोळे, रा. राम मंदिर जवळ, सिंदेवाही, जि. चंद्रपुर यांचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये ३० नग खर्डाचे खोक्यात प्रत्येक खोक्यात १०० नग रॉकेत संत्रा ९० एम. एल. देशी दारूनी भरलेली असे एकुण ३,००० नग प्रत्येकी नग ३५/- रू. प्रमाणे १,०५,०००/- रूपये चा माल तसेच गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३५ के. ४१५९ किमंत ७,००,०००/- रूपये असा एकुण ८,०५,०००/- रूपये असे जप्त करून आरोपीतांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन, मुल यांचे ताब्यात देण्यात आले.
A case has been registered against smugglers of aromatic tobacco Jaisukh Thakkar and Mahesh Gupta in Chandrapur district...
तसेच दिनांक २९/०४/२०२४ रोजी रात्रौ दरम्यान पोलीस स्टेशन, रामनगर परिसरात पेट्रोलींग दरम्यान मुखबिरचे खबरे वरून आरोपी महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी. एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर याचे घराची तसेच त्यांने किरायाने घेतलेल्या खोलीची पंचा समक्ष झडती घेतली असता, सदर दोन्ही ठिकाणी ईगल हुक्का सुगंधीत तंबाकु, होला हुक्का सुगंधीत तंबाकु तसेच मजा १०८ सुगंधीत तंबाकु असा एकुण २,१४,२२०/- रूपयाचा माल जप्त करून नमुद आरोपी महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी.एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यास जप्त सुगंधीत तंबाकु बाबत विचारणा केली असता त्यांनी जयसुख ठक्कर रा. बल्लारशाह जि. चंद्रपुर याचेकडुन आणल्याचे सांगितले. त्यावरून नमुद दोन्ही आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगरचे ताब्यात देण्यात आले.

वरील दोन्ही कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे शाखा यांनी एकुण १०,१९,२२०/- रूपयाचा माल जप्त

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा /११७६ किशोर वैरागडे, पोहवा /२२९६ रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा/५३२ सतिश अवथरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment